महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पर्यटन

कल्याण एसटी आगाराच्या बसला अपघात, स्टिअरिंग रॉड तुटल्याने बसला अपघात,

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी –  कल्याण एसटी आगाराच्या बसेसच्या अपघातांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. बसचे पुढचे चाक निखळून झालेल्या अपघाताला काही आठवडे उलटत नाहीत तोच आज सकाळी पुन्हा एकदा बसचा स्टेअरिंग रॉड तुटून अपघाता झाला. यावेळीही बस झाडाला धडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी एसटी प्रशासन मोठ्या जीवघेण्या अपघाताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

आज सकाळी कल्याण आगाराची ही बस सुमारे 20- 25 प्रवाशांना घेऊन माळशेज मार्गे आळेफाटा येथे निघाली होती. मात्र मुरबाडच्या पुढे असलेल्या गावाजवळून ही बस जात असताना अचानक बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने ही बस थोडी पुढे जाऊन रस्त्यावरून खाली उतरली. आणि रस्त्याशेजारी झुडपांमध्ये असलेल्या झाडाला या बसने धडक दिली. ज्यामध्ये बसच्या उजव्या भागाचे काही नुकसान झाले आणि बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर वाहकालाही मुकामार लागल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र सुदैवाने ही बस झाडाला धडकल्याने पुन्हा एकदा मोठा अपघात टळला. काही अंतरावर पुढे असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असता तर मग काहीही होऊ शकले असते. तर या अपघाताबाबत कल्याण एसटी आगाराचे व्यवस्थापक महेश भोये यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो होऊ शकला नाही.

दरम्यान काही आठवड्यांपूर्वीही कल्याण एसटी आगाराच्या बसचे पुढचे चाक निखळून अपघाता झाला होता. त्यापाठोपाठ आता आज स्टेअरिंग रॉड तुटून झालेला अपघाताचा विचार करता कल्याण आगारातील बसेसच्या देभभाल दुरुस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देखभाल दुरुस्तीचे काम करूनही असे अपघात होत का आहेत ? की बसेसच्या देखभाल दुरुस्ती कामामध्ये काही तडजोड केली जात आहे का? आणखी किती मोठा अपघात झाल्यावर की प्रवाशांचा बळी गेल्यावर एसटी प्रशासन जागे होणार आहे असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »