महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांचे नालेसफाई व कचरा व्यवस्थापनासंदर्भात ठेकेदारावर ताशेरे

DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याण डोंबिवलीत थोड्याशा पावसाने पुराचे रूप येणे ही काही समस्या नवीन नाही. दर वेळी नालेसफाई करणे आणि नंतर पावसाळ्यात पाणी साचणे ही बाब नित्याचीच अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा हलगर्जी पणा यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणजे हा सर्व कारभार राम भरोसे आहे की काय असे नागरिकांना वाटत असताना नवीन आयुक्त गोयल नालेसफाई व कचरा व्यवस्थापनासंदर्भात हे स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात पुर परिस्थितीचा नागरिकांना करावा लागणार नाही असे तरी दिसत आहे. 
आगामी येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका सज्ज होत असताना, ५ ड प्रभागातील नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापनाच्या कामाबाबत आयुक्त अभिनव गोयल यांनी ३ मे २५ रोजी कडक पावले उचलली. या बैठकीत मोठ्या, मध्यम आणि लहान नाल्याची स्वच्छता पाणी करताना कामाचा प्रचंड ढिसाळपणा आढळून आला. यावर महापालिका आयुक्तांनी थेट ताशेरे ओढत, संबंधित ठेकेदारावर”तीव्र नाराजी”व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, कामातील संथगती  आणि  हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.
ठेकेदारास तात्काळ मनुष्यबळ वाढविण्याचे, यांत्रिक साधनाचा प्रभावी वापर करण्याचे आणि कामाच्या पद्धतीत त्वरित सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले. रस्त्यावरील स्वच्छतेनंतर पडून राहणारा कचरा आणि त्याची नियोजनशून्यता यावरही आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, कचरा तातडीने हटवण्याच्या सूचनाही दिल्या. या हलगर्जीपणामुळे संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देत, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, जीएसटी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कामगार कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्त गोयल यांनी दिला. या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील,३ क प्रभाग क्षेत्र सहा. आयुक्त धनंजय थोरात,५ ड प्रभाग क्षेत्र सहा. आयुक्त उमेश यमगर मुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि ठेकेदार आनंद पवार उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, संपूर्ण शहरात पावसाळ्यापूर्वी दर्जेदार आणि वेळेत नालेसफाई चे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. येत्या काळात इतर प्रभागाची ही पाहणी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »