महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

कल्याण एपीएमसी बाजार सभापती पदी रवींद्र घोडविंदे तर उपसभापती पदी जालिंदर पाटील

DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी रवींद्र घोडविंदे तर उपसभापती पदी जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची निवडणूक झाली. सभापती व उपसभापती या दोन्ही पदावर भाजपाने शिक्कामोर्तब करीत बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकवला.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदाच्या जागांसाठी गेल्या एक दीड आठवडा भरा पूर्वी झालेल्या निवडणुकीत  शेतकरी सहकारी विकास पॅनल खाली महायुतीच्या भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने एक हाथी सत्ता काबीज करीत सर्वाधिक सोळा जागा पटकावल्याने महायुतीचा बाजार समितीवर झेंडा फडकाविला. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी कल्याण तालुक्यावर आपली पकड असल्याचे दाखवून देत शेतकरी पत संस्था व ग्रामपंचायतीच्या जागा स्वबळावर निवडून आणल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व दाखवून दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्फत सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. सभापती पदा साठी रवींद्र  घोडविंदे व उपसभापती पदासाठी जालिंदर पाटील या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. नवनिर्वाचित सभापती रवींद्र घोडविंडे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा सभापती पदाची माळ पडली असून भाजपाचे आमदार किसन कथोरे यांचे खंदे असल्याने सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार कथोरे हे देखील  उपस्थित राहिले होते. उपसभापती जालिंदर पाटील हे या पूर्वी दोन टर्म कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर निवडून आले होते व नुकत्याच पार पडलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून  आले आहेत.
 दरम्यान यावेळी बोलताना सभापती घोडविंदे यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने संचालक मंडळातील सर्व पक्षातील सदस्यांना एकत्रित घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने केली जाणार असल्याचे सांगितले तसेच बाजार समितीच्या आवारातील फुल, भाजी मार्केट मधील साठलेला कचऱ्याचा ढीग रस्त्यावर जागोजागी पडलेला दिसत असल्याने या साचल्या जाणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायोगॅस प्रकिया प्रकल्प राबवून त्या पासून खत निर्मितीचा प्रकल्प येत्या काळात सुरू करण्यात येणार आहे. तसेच बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »