महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश न्युजरूम

भारतीय नौदलाकडे प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी सुपूर्द

DESK MARATHI NEWS.

मुंबई/प्रतिनिधी – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएसएल) येथे बांधलेली प्रोजेक्ट 17ए श्रेणी  मधील स्टेल्थ युद्धनौका प्रकारातील दुसरी नौका, यार्ड 12652 (उदयगिरी) हे 1 जुलै 2025 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. हा  सेवेत सक्रिय असलेल्या शिवालिक वर्ग (प्रोजेक्ट 17) युद्धनौकांचाच एक भाग आहे. माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनिअर्स( जी आर एस ई ), कोलकाता येथे निर्मिती होत असलेल्या सात पी 17ए युद्धनौकांपैकी उदयगिरी ही दुसरी आहे.

या बहु-अभियान युद्धनौका ‘नील जल’ वातावरणातील परिचालनास सुयोग्य असून भारताच्या सागरी हितसंबंध क्षेत्रातील पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांना तोंड देण्यास सक्षम आहेत. उदयगिरी हा त्याच्या पूर्वीच्या आयएनएस उदयगिरीचा आधुनिक अवतार आहे. हे एक वाफेवर चालणारे जहाज होते, देशाला 31 वर्षांची गौरवशाली सेवा दिल्यानंतर 24 ऑगस्ट 2007 रोजी ते निवृत्त झाले होते.

पी-17ए  जहाजांमध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये आहेत आणि त्यात ‘अत्याधुनिक’ शस्त्रे आणि सेन्सर्स बसवले आहेत, जे पी17वर्गातील एक महत्त्वपूर्ण सुधारणा आहेत. हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोमधील इन हाऊस डिझाइन क्षमतांमधील मोठी झेप दर्शविते. नवीन डिझाइन केलेली जहाजे ‘एकात्मिक बांधकाम’ या तत्वज्ञानाचा वापर करून देखील बांधली जात आहेत, ज्यामध्ये एकूण बांधकाम कालावधी कमी करण्यासाठी ब्लॉक टप्प्यांवर व्यापक पूर्व-सामग्री समाविष्ट आहे. आरंभ तारखेपासून 37 महिन्यांच्या विक्रमी वेळेत भारतीय नौदलाकडे उदयगिरी सुपूर्द करण्यात आले आहे.

दयगिरीमुळे जहाजाची रचना, जहाज बांधणी आणि अभियांत्रिकी कौशल्य यातील देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडते. 200 हून अधिक एमएसएमईंनी समर्थित असलेल्या मजबूत औद्योगिक परिसंस्थेने हे सक्षम केले आहे. या युद्धनौकेमध्ये स्वदेशी ओईएमकडून मिळालेली प्रमुख शस्त्रे आणि सेन्सर्स बसविण्यात आले आहेत.

पी 17ए वर्गातील उर्वरित पाच जहाजे एमडीएल, मुंबई आणि जीआरएसई, कोलकाता येथे बांधकामाच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि 2026 च्या अखेरीला क्रमाक्रमाने उपलब्ध केली जातील.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »