महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी बिझनेस

नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात सातारा जिल्ह्याच्या स्वयंसहायता गटाच्या दालनाचे उद्घाटन

DESK MARATHI NEWS NETWORK.

नवी दिल्ली/प्रतिनिधी –  महाराष्ट्र सदननवी दिल्ली येथे सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांच्या (SHG) उत्पादनांसाठी कायमस्वरूपी दालनाचे उद्घाटन आज निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.  यावेळी अपर निवासी आयुक्त निवा जैन व  सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार उपस्थित होत्या.

यंदा 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील लखपती दीदीबचत गटाच्या प्रमुख आणि आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) पुरस्कार विजेत्या दीदी यांच्यासह 20 महिलांनी सहभाग घेतला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र सदनात श्रीमती विमला यांची भेट घेऊन आपली हस्तकलाखाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादने भेट म्हणून सादर केली होती. या भेटीत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन यांनी तयार केलेले निवेदन प्रतिनिधींमार्फत सुपूर्द केले होतेज्यात बाजारपेठ आणि प्रदर्शनांमध्ये सहभागाची संधी तसेच आवश्यक समर्थनाची विनंती करण्यात आली होती. श्रीमती विमला यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देतया महिलांना त्यांची उत्पादने राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच आश्वासनाला प्रत्यक्ष रूप देत आज या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक वारशाला राष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याच्या उद्देशाने श्रीमती विमला यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नांमुळे हे दालन अल्पावधीत साकार झाले आहे. दिल्लीच्या विशाल बाजारपेठेत स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांना असलेली मागणी लक्षात घेताहे दालन सातारा जिल्ह्यातील ग्रामीण उद्योजकांना त्यांची कलाकौशल्य आणि उत्पादने सादर करण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ प्रदान करेल.

सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांनी शेतीअन्नपदार्थ आणि हस्तकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इंद्रायणी तांदूळसेलम-हळदसेंद्रिय ज्वारीबाजरीस्ट्रॉबेरीजागरीशेंगदाणा तेलघोंगडीरेशीम वस्त्रेसाबणमसाले आणि बाजरीचे कुकीज यांसारख्या उत्पादनांनी स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेत विशेष ओळख निर्माण केली आहे. विशेषतः साताऱ्याच्या घोंगडी आणि रेशीम वस्त्रांनी त्यांच्या टिकाऊपणा आणि सांस्कृतिक मूल्यांमुळे दिल्लीच्या ग्राहकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना श्रीमती विमला म्हणाल्या  सातारा जिल्ह्यातील लखपती दीदी आणि स्वयंसहायता गटांच्या महिलांनी  भेटीदरम्यान दाखवलेल्या उत्साह आणि त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे हे दालन साकारण्याची प्रेरणा मिळाली. हे दालन सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण उद्योजकांना त्यांची कला आणि कौशल्य राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याची संधी देईल. दिल्लीतील मराठी बांधव आणि अन्य ग्राहकांनी या दालनाला भेट देऊन या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे. त्यांनी पुढे सांगितले कीहे दालन केवळ विक्री केंद्र नसूनसातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक वारशाला राष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

या उपक्रमाला ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान दालनासाठी प्रस्तावित जागेची पाहणी करून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. या दालनामुळे त्यांना दिल्लीच्या बाजारपेठेत कायमस्वरूपी स्थान मिळेल, असे गोरे यांनी नमूद केले. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले कीया दालनामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य ओळख मिळेल.

दालनात सातारा जिल्ह्याची खास उत्पादनेभौगोलिक मानांकन (GI) प्राप्त वस्तूशेती उत्पादनेहस्तकला आणि गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. भविष्यात फिरते दालन आणि बहुमजली मॉल यांसारख्या सुविधा उपलब्ध करून ग्रामीण उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणाला आणखी चालना देण्याचे नियोजन आहे. हे दालन महाराष्ट्र सदनाला सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्राचे स्वरूप देईलतसेच ग्रामीण उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवून त्यांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा देईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »