महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क पर्यटन

रेलवन ॲपचे उद्घाटन,प्रवाशी सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने रेल्वेचे आणखीन एक पाऊल

DESK MARATHI NEWS.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – सतत पावले उचलत असते. नवीन पिढीच्या गाड्या सुरू करणे, स्थानकांचा पुनर्विकास करणे, जुन्या डब्यांचे नवीन एलएचबी डब्यांमध्ये श्रेणीवर्धन करणे अशा अनेक पावलांमुळे गेल्या दशकात प्रवाशांचा अनुभव सुधारला आहे.सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे RailOne या नवीन ॲपचा प्रारंभ केला. रेलवन हे ॲप रेल्वे आणि प्रवासी यांच्यातील संवाद सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते.हे एक व्यापक, सर्वसमावेशक ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस आहे. हे ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. यात सर्व प्रवासी सेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत, उदाहरणार्थ :

  • 3% सवलतीसह अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटे
  • लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग
  • तक्रार निवारण
  • ई-कॅटरिंग, पोर्टर बुकिंग आणि शेवटच्या मैलापर्यंतची टॅक्सी

आयआरसीटीसीवर आरक्षित तिकिटांची उपलब्धता कायम राहील. आयआरसीटीसीसोबत भागीदारी केलेल्या इतर अनेक व्यावसायिक अ‍ॅप्सप्रमाणेच रेलवन अ‍ॅपलाही आयआरसीटीसीने अधिकृत केले आहे.RailOne मध्ये mPIN किंवा बायोमेट्रिकद्वारे लॉगिनसह सिंगल-साइन-ऑनची सुविधा आहे. हे विद्यमान RailConnect आणि UTS संदर्भांनादेखील संलग्न करता येते. हे ॲप जागा वाचवणारे आहे, कारण इतर अनेक ॲप्स स्थापित करण्याची आवश्यकता उरत नाही.

डिसेंबर 2025 पर्यंत आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस)

रेल्वेमंत्र्यांनी सीआरआयएसच्या संपूर्ण चमूचे स्थापना दिनानिमित्त अभिनंदन केले. त्यांनी सीआरआयएसला भारतीय रेल्वेच्या डिजिटल गाभ्याला अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.विद्यमान आरक्षण प्रणालीचे श्रेणीवर्धन करण्याच्या प्रगतीबद्दल मंत्र्यांनी सीआरआयएस चमूचे कौतुक केले. आधुनिक आरक्षण प्रणाली वेगवान , बहुभाषिक आणि सध्याच्या भारापेक्षा 10 पट जास्त भार हाताळण्याच्या दृष्टीने प्रमाणशीर असेल. ती प्रति मिनिट 1.5 लाख तिकीट बुकिंग आणि 40 लाख चौकशींचा सामना करण्यास सक्षम असेल.नवीन आरक्षण प्रणाली सर्वसमावेशक असेल. त्यात आसन निवड आणि भाडे तक्त्यासाठी प्रगत कार्यक्षमता तसेच दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्ण इत्यादींसाठी एकात्मिक पर्याय असतील.

भविष्य निश्चित करणारे तंत्रज्ञान

भारतीय रेल्वेची प्रगती पंतप्रधान यांच्या भारताच्या  विकास यात्रेचे विकास इंजिन बनण्याच्या दृष्टिकोनातून होतं आहे. रेलवन ॲपच्या प्रारंभामुळे तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आणि प्रत्येक प्रवाशाला जागतिक दर्जाची गतिशीलता प्रदान करण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेची पुष्टी होते.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »