DESK MARATHI NEWS.
मुंबई/प्रतिनिधी -सीमाशुल्क विभागाने मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, 21.06.2025 रोजी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई सीमाशुल्क विभाग झोन III येथील अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय नागरिकांना अडवले. त्यांच्या चेक-इन केलेल्या सामानाची तपासणी केली असता अधिकाऱ्यांना त्यात हवाबंद केलेली अनेक पाकीटे सापडली. या प्रवाशांनी वाहून आणलेल्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेल्या उशाच्या अभ्र्यामध्ये हा अवैध पदार्थ लपवण्यात आला होता.
या पाकिटांमध्ये हिरव्या रंगाचा पदार्थ होता, जो प्राथमिकदृष्ट्या हायड्रोपोनिक गांजा असल्याचे आढळले. एकूण 11.881 किलोग्रॅम निव्वळ वजन असलेल्या या अमली पदार्थाची बेकायदेशीर बाजारातील अंदाजे किंमत 11.88 कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रवाशांना अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या तस्करीच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या मोठ्या जाळ्याची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.