महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

मे महिन्यातच जोरदार पावसाने झोडपले, उल्हास नदी किनाऱ्या लगतच्या गावाना सतर्क इशारा

DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने थैमान घातले आहे.त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले दिसत आहे. जोरदार पावसाचा मोठा फटका हा सर्वच स्तरावर बसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. मुंबईतही रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी चाचल्याने  रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहे. ठाणे जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच जोडपले आहे. त्याचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवर सुद्धा पाहायला मिळाला आहे, रायते पूल पाण्याखाली गेल्यामुळे कल्याण नगर मार्ग वाहतुकीसाठी काही वेळेसाठी बंद करण्यात आला होता. पावसाने 26 जुलैची आठवण 26 मे ला करून दिली असल्याचे दिसत आहे. 
कल्याण नगर मार्गावरील मुरबाड रोड रायते येथील पुलाला उल्हास नदीचे पाणी लागण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण-मुरबाड मार्ग बंद केला आहे. त्याचबरोबर प्रशासनाकडून नदीलगतच्या गावाना सतर्क इशारा देण्यात आला आहे. मुरबाड बदलापूर परिसरात मुसळधार पावसाने उल्हास नदी आणि गांधारी नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसामुळे नदीने उग्ररूप धारण केलेले पाहायला मिळत आहे.  
   उल्हास नदी प्रवाह अचानक वाढल्याने चार म्हशी पाण्यात वाहून गेल्या त्याच बरोबर नदी किनाऱ्या वरील गावानं म्हारळ, कांबा,वरप ,रायते, मोहने गावातील ग्रामस्थान सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे .अद्याप पुलावरून पाणी गेले नसले तरी वाहतूक पूर्णपणे थांबवली असून वाहन चालकाला त्रास होऊ नये म्हणून ही वाहतूक  टिटवाळा मार्गे वळवण्यात आली असल्याची कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी माहिती दिली आहे 
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »