महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क महाराष्ट्र

पावसाळ्यात सुरळीत वीजपुरवठा व सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्या – व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र

DESK MARATHI NEWS.

नाशिक/प्रतिनिधी – सध्या मान्सून सक्रीय झाला असून पावसाळ्यात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्यासोबतच ग्राहक व कर्मचारी यांच्या विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. कोणत्याही कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी स्वरूपात किंवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून खंडित विजेचा कालावधी कमीत कमी राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी दिले.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागातील नाशिक, जळगाव, भांडूप, कल्याण व रत्नागिरी परिमंडलातील विविध कामांचा लोकेश चंद्र यांनी आढावा घेतला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक (प्रकल्प/संचालन) सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांची उपस्थिती होती.

या आढावा बैठकीमध्ये लोकेश चंद्र यांनी फीडर मिटरिंग, नेटवर्क प्लॅनिंग, अधिक वीजहानीच्या उच्चदाब वाहिन्या, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती, नवीन वीजजोडण्या, सौरग्राम, विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स, टीओडी मीटर आदींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

कोकण प्रादेशिक विभागामध्ये नाशिक व जळगाव परिमंडळामध्ये वीज देयकांची  सर्वाधिक थकबाकी आहे. त्यामुळे या दोन्ही परिमंडलासह इतर ठिकाणी देखील थकबाकीसह चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करणे क्रमप्राप्त आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्यामुळे वाढणारी थकबाकी ही चिंतेची बाब आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये अपेक्षित वसूली झालेली नाही. त्यामुळे थकबाकी वसूलीमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही असे श्री. लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेद्वारे सौरग्राम योजनेला मोठे पाठबळ मिळत आहे. सर्वच घरगुती ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या गावाला सौरग्राम करता येणे सहजशक्य आहे. तसेच या योजनेतून पुढील २५ वर्ष मोफत वीज घरगुती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना व सौरग्रामचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणचे स्थानिक अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावागावांमध्ये प्रबोधन करावे अशी सूचना  लोकेश चंद्र यांनी दिली.

या आढावा बैठकीला कोकण प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंते सुंदर लटपटे (नाशिक), इब्राहीम मुलाणी (जळगाव), चंद्रमणी मिश्रा (कल्याण), संजय पाटील (भांडूप) व अनिल डोये (रत्नागिरी) यांच्यासह सर्व अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »