महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम मुंबई

मुंबईतील 10,000 रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एफएसएसएआय आणि बीएमसी प्रशिक्षण देणार

DESK MARATHI NEWS.

मुंबई/प्रतिनिधी – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय), आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सहकार्याने सुमारे 400 रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी  व्यापक अन्न सुरक्षा प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. मुंबईत भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाच्या सभागृहात हे प्रशिक्षण सत्र पार पडले.

हा उपक्रम एफएसएसएआय आणि बीएमसी यांच्यात सामंजस्य कराराद्वारे झालेल्या दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीचा एक भाग असून, खाद्य पदार्थ विक्री सेवेच्या सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतींना प्रोत्साहन देऊन मुंबईच्या गतिमान ‘स्ट्रीट फूड’ संस्कृतीत बदल घडवून आणणे हे याचे उद्दिष्ट आहे. मुंबईतील 10 हजाराहून अधिक स्ट्रीट फूड, अर्थात रस्त्यावरील खाद्य पदार्थ  विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे प्रशिक्षण देणे, हे या भागीदारीचे व्यापक उद्दिष्ट आहे. प्रशिक्षण सत्रात वैयक्तिक स्वच्छता, अन्न हाताळणीचे योग्य तंत्र, सुरक्षित साठवणूक पद्धती आणि अन्न प्रदूषण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसह अन्न सुरक्षेच्या प्रमुख पैलूंवर विशेष भर देण्यात आला. एफएसएसएआयच्या ‘ईट राईट इंडिया’ चळवळीला अनुसरून, लोकांना उच्च दर्जाचे, सुरक्षित अन्न पुरवण्याच्या महत्त्वावरही या सत्रात भर देण्यात आला.

एफएसएसएआय आणि बीएमसी या दोन्ही संस्थांचे अधिकारी प्रशिक्षण सत्राची पाहणी करण्यासाठी आणि सहभागींशी संवाद साधण्यासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. या उपक्रमाला विक्रेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यापैकी अनेक जणांनी आपल्याला अन्न सुरक्षेबद्दल अधिक माहिती मिळवण्याची आणि योग्य पद्धती शिकण्याची संधी मिळाली, याबद्दल आनंद व्यक्त केला.

हा उपक्रम मुंबईत अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य विषयक जागरूकतेच्या संस्कृतीला चालना देण्यासाठीच्या एफएसएसएआय आणि बीएमसीच्या संयुक्त प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. व्यापक सहभाग मिळवण्यासाठी आणि शाश्वत परिणाम साधण्यासाठी येत्या काही महिन्यांत आणखी काही प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »