महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण मध्ये सिलेंडरच्या स्फोटात चार दुकाने जळून खाक

DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील डॉ. आंबेडकर रोडवरील लोहार आळी येथे रविवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली.एका वेल्डिंग दुकानात सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली.यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी साडेपाचच्या सुमारास गौरसिया चाळीजवळील वेल्डिंग दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला. बहुतेक दुकाने बेकायदेशीर उभारण्यात आली होती त्यामुळे कुठून अग्निशमन व्यवस्था येणार परिणीती वित्तीय हानीत होणारच!
या आगीत क्लासेसचे एक दुकान व कमउद्दिन शेख व निजामुद्दीन सय्यद यांच्या दुकानांसह चार दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी वेळीच पोहचून दोन तासाच्या प्रयत्नात आग आटोक्यात आणली.अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, गॅस सिलेंडरमध्ये उष्णता निर्माण झाल्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.आग एवढी तीव्र होती की तिने काही क्षणात आजूबाजूच्या दुकानांनाही आपल्या विळख्यात घेतले.दरम्यान ,काही दिवसापूर्वी डोंबिवलीतही अशीच आग लागल्याची घटना घडली होती.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »