महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी देश

भारत निवडणूक आयोग मतदान ओळखपत्राच्या वितरणाला देणार गती

DESK MARATHI NEWS

नवी दिल्ली/प्रतिनिधी – मतदारांना त्यांचे मतदार ओळपत्र (EPIC) लवकर  मिळावेत, याची सुनिश्चिती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने (ECI) एक नवीन मानक कार्यपद्धती (SOP) लागू केली आहे. याअंतर्गत नवीन मतदार नोंदणीसह, मतदाराने आपल्या विद्यमान तपशीलात बदल वा सुधारणा केल्यानंतर ते मतदार यादीत अद्ययावत केल्यापासून 15 दिवसांच्या आत मतदान ओळखपत्रांचे मतदारांपर्यंत वितरण शक्य होणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी मतदारांच्या सुलभतेसाठी केलेल्या संकल्पानुसार भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबवल्या जात असलेल्या विविध उपाय योजनांना अनुसरून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या नवीन प्रणालीअंतर्गत आता निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांद्वारे (ERO) मतदार ओळखपत्र क्रमांक जारी  केल्यापासून ते टपाल विभागाद्वारे मतदाराला त्याचे मतदार ओळखपत्र मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याच्या प्रगतीची प्रत्यक्ष त्या त्या वेळची माहिती उपलब्ध असेल याची सुनिश्चिती केली गेली आहे. याचबरोबर मतदारांनाही त्यांच्या मतदार ओळखपत्राच्या प्रत्येक टप्प्यावरील स्थिती -गतीची माहिती  एसएमएसद्वारे सूचना पाठवून दिली जाणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, भारत निवडणूक आयोगाने आपल्या नुकत्याच सुरू केलेल्या ‘ECINet’ या व्यासपीठाला  एक समर्पित माहिती तंत्रज्ञानाधारीत प्रारूपाची जोड दिली आहे. हे माहिती तंत्रज्ञानाधारीत नवीन व्यासपीठ विद्यमान प्रणालीला पुनर्अभियांत्रित करून आणि कार्यप्रवाहाचे सुव्यवस्थिकरण करून त्याच्या जागा कार्यान्वित होणार आहे. याचबरोबरीने सुरळीत वितरणाच्या सुनिश्चिततेसाठी टपाल विभाच्या ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेसचे (API) ECINet सोबत एकात्मिकरण घडवून आणले जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून माहिती साठ्याच्या सुरक्षिततेसोबतच सेवा वितरणात वृद्धी घडवून आणण्याचे उद्दिष्ट भारत निवडणूक आयोगाने समोर ठेवले आहे.

सर्व मतदारांना निर्धारित वेळेत आणि कार्यक्षमतेने निवडणूक विषयक सेवा प्रदान करण्याला भारत निवडणूक आयोगाने आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर ठेवले आहे. त्यादृष्टीनेच भारत निवडणूक आयोगाने गेल्या चार महिन्यांत मतदारांसह इतर भागधारकांच्या हितासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »