महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

कल्याणच्या गांधारी पुलाचा 20 फुटांचा कठडा तोडून डंपर नदीत, भीषणअपघातात महिलेचा मृत्यू

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या गांधारी पुलाचा 20 फुटांचा कठडा तोडून डंपर नदीत गेला .गांधारी पुलावर भरधाव वेगात आलेल्या डंपरने रिक्षाला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर रिक्षाचालक जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गांधारी पुलाचा तब्बल 20 फुटापर्यंतचा कठडा तोडून डंपर थेट नदीमध्ये कोसळला. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

सकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही रिक्षा बापगावकडून कल्याणच्या दिशेला येत होती. तर हा ट्रक अतिशय भरधाव वेगाने कल्याणकडून बापगावकडे येत होता. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये डंपरचालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या रिक्षेला त्याने जोरदार धडक दिली. आणि कोणाला काही कळायच्या आतच पुलाचा कठडा तोडून हा डंपर थेट नदीमध्ये जाऊन कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

तर या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती कळवली. त्यानूसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षेच्या पुढच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला होता.

या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून ती रिक्षा चालकाची आई होती अशी माहिती मिळाली आहे तसेच रिक्षाचालकही जखमी झाल्याचे समजते. तर नदीमध्ये पडलेल्या डंपरमध्ये चालकासोबत आणखी कोण होते की नाही याचीही माहिती समजू शकलेली नाही.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »