महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क पोलिस टाइम्स

डीआरआयने तस्करीचे सोने वितळवणाऱ्या प्रमुख कारखान्याचा केला पर्दाफाश

DESK MARATHI NEWS.

मुंबई/प्रतिनिधी – “ऑपरेशन अल्केमिस्ट” या सांकेतिक नावाने रात्रीच्या वेळी  काटेकोरपणे राबवलेल्या मोहिमेत , महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागीय युनिटने एका संघटित टोळीद्वारे भरती करण्यात आलेल्या वाहक प्रवाशांद्वारे दुबईहून भारतात तस्करी करून आणलेले सोने  वितळवण्याच्या  प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका मोठ्या अवैध  गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा  पर्दाफाश केला.

या कारवाईदरम्यान, सोने  वितळवण्याचे काम सुरु असलेल्या या  कारखान्यातून  बाहेर पडणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आणि त्यांच्या ताब्यातून बार स्वरूपात 8.74 किलो सोने जप्त करण्यात आले. या कारखान्याचा  तात्काळ शोध घेतल्यामुळे  तस्करी केलेल्या सोन्याचे बारमध्ये रूपांतर करण्यात सक्रिय असलेल्या दोन ऑपरेटरना अटक करण्यात यश आले.

तपासात असे दिसून आले की त्याच दिवशी मुंबईतील सीएसएमआय विमानतळावरून भारतात सोने असलेल्या  18 अंड्याच्या आकाराच्या  कॅप्सूलची भारतात तस्करी करण्यात आली होती. या कॅप्सूल कारखान्यात वितळवून सहा बारमध्ये रूपांतरित करण्यात आल्या, ज्यांचे एकूण वजन 8.74 किलो होते.

पाठपुराव्यादाखल केलेल्या कारवाईत तस्करी केलेल्या कॅप्सूल गोळा करण्यात सहभागी असलेल्या आणखी दोन व्यक्तींना आणि वितळवण्याच्या कामांचे व्यवस्थापन करणाऱ्या प्रमुख व्यक्तीला अटक करण्यात आली.

एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेले सोने, ज्याची किंमत 8.93 कोटी रुपये आहे, ते सीमाशुल्क कायद्यांतर्गत जप्त करण्यात आले आहे आणि सर्व सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या यशस्वी  मोहिमेतून सोन्याच्या तस्करीला रोखण्याचा आणि भारताच्या आर्थिक हितांचे रक्षण करण्याचा डीआरआयचा  निरंतर  दृढनिश्चय  अधोरेखित होतो. कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि तस्कर आणि त्यांच्या गुन्हेगारांविरुद्ध सतर्क अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी डीआरआय वचनबद्ध आहे.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »