महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश न्युजरूम

डीआरडीओने घेतल्या स्ट्रॅटोस्फिअरिक एअरशिप हवाई तळाच्या प्राथमिक उड्डाण चाचण्या

DESK MARATHI NEWS/

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – संरक्षण मंत्रालयाच्या डीआरडीओ म्हणजेच संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) मध्य प्रदेशातील श्योपूर चाचणी स्थळावरून 3 मे 2025 रोजी स्ट्रॅटोस्फिअरिक अर्थात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काही मैल अंतरावरील बाहय आवरणात एअरशिप हवाई तळाच्या प्राथमिक उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या घेतल्या. आग्रा येथील हवाई संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेली ही एअरशिप सुमारे 17 किमी उंचीवर एक साधनसामग्री वाहक घेऊन प्रक्षेपित करण्यात आली

या साधनसामग्री बरोबर असणाऱ्या संवेदकांकडून डेटा प्राप्त झाला असून त्याचा वापर भविष्यातील अतिशय उंची गाठणाऱ्या प्रस्तावित एअरशिप उड्डाणांसाठी उच्चकोटीची गुणवत्ता असलेल्या फिडेलिटी सिम्युलेशन मॉडेल्सच्या विकासासाठी केला जाईल. त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या उड्डाणात आवरण दाब नियंत्रक आणि आपत्कालीन दाब शिथिल प्रणाली तैनात करण्यात आल्या होत्या. चाचणी पथकाने या पुढील तपासण्यांसाठी प्रणाली पूर्वपदावर आणली. या उड्डाणाचा एकूण कालावधी सुमारे 62 मिनिटे एवढा राहिला.

या प्रणालीच्या यशस्वी प्राथमिक उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. ही प्रणाली भारताची पृथ्वी निरीक्षण आणि सर्वेक्षण, देखरेख तसेच गुप्तचर क्षमता अनोख्या पद्धतीने विकसित करेल, ज्यामुळे देश अशा प्रकारची स्वदेशी क्षमता असलेल्या जगातील काही मोजक्या देशांपैकी एक बनेल असे प्रतिपादन त्यांनी केले.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »