महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य न्युजरूम

सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याच्या निर्देशा विरोधात डॉक्टरांचा संप

DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक जारी करून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) च्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयाचा भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) महाराष्ट्र राज्याने तीव्र विरोध दर्शविला असून उद्या गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे.

आयएमएने स्पष्ट केले की, हे डॉक्टर आधीच महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत. शासनाने घेतलेला हा निर्णय ११ जुलै २०२४ रोजीच्या स्वतःच्या परिपत्रकाच्या विरोधात असून, यासंदर्भातील खटला माननीय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना काढलेले हे परिपत्रक कायद्याला धरून नसलेले व न्यायालयाचा अवमान करणारे आहे.

या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होईल, आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा तसेच व्यवसायाचा दर्जा घसरेल. तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल, अशी भूमिका आयएमएने मांडली आहे. तर अपुरे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार म्हणजे थेट त्यांच्या जीवाशी खेळ असल्याची भीतीही आयएमएकडून व्यक्त करण्यात आली आहे.तर यासंदर्भात गुरुवारी १८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यभरातील सर्व डॉक्टर एक दिवसाचा संप करतील. ज्यामध्ये आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली आहे. तसेच शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा आणि बेमुदत उपोषणही छेडण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »