महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य न्युजडेस्क

डॉक्‍टर्स डे निमित्त कल्‍याण फोर्टिस हॉस्पिटलचा क्विक रिस्‍पॉन्‍स ट्रेनिंग उपक्रम

DESK MARATHI NEWS.

कल्‍याण/प्रमोद तांबे – जुलै १, २०२५: कल्‍याणमधील फोर्टिस हॉस्पिटलने आज डॉक्‍टर-केंद्रित क्विक रिस्‍पॉन्‍स ट्रेनिंग (क्‍यूआरटी) उपक्रम ‘कोड क्‍यूआरटी’ची घोषणा केली. या उपक्रमाचा तरूण अननुभवी प्रॅक्टिशनर्सना निदान व वैद्यकीय मूल्‍यांकन कौशल्‍यांसह सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. १ जुलै रोजी डॉक्‍टर्स डे निमित्त या १५-दिवसीय प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले. हा उपक्रम अननुभवी प्रॅक्टिशनर्सना सक्षम करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. फोर्टिस हॉस्पिटल्‍स मुंबईच्‍या ईसीएमओच्‍या प्रोग्राम डायरेक्‍टर (प्रोग्राम कन्‍व्‍हेनर) डॉ. जुमाना हाजी, फोर्टिस हॉस्पिटल्‍स मुंबईचे फर्स्‍ट एड व बीएसएल अँड सीपीआर ट्रेनर डॉ. मनजीत सिंग, इमर्जन्‍सी मेडिसीनचे एचओडी डॉ. सुधीर गोरे आणि फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणच्‍या इमर्जन्‍सी मेडिसीनचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. मनोज कुमार हे कोड-क्‍यूआरटीचे नेतृत्‍व करतील. या उपक्रमामधून प्राथमिक केअरगिव्‍हर्सना अपस्किलिंगच्‍या माध्‍यमातून सुसज्‍ज करण्‍यासोबत प्रदेशातील रूग्‍णांच्‍या आरोग्‍यसेवा गरजांची उत्तमप्रकारे पूर्तता करण्‍यास सक्षम करण्‍याप्रती फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणची कटिबद्धता दिसून आली.

कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या भागातील अनेक गंभीर आजारी रुग्णांना आजाराच्‍या प्रगत टप्प्यात मुंबईतील तृतीयक केंद्रांमध्ये हलवले जाते हे ओळखून, फोर्टिस हॉस्पिटल कल्याणमधील क्लिनिशियन्सनी हा प्रशिक्षण उपक्रम विकसित केला, ज्‍यामुळे जवळच्‍या परिसरातील अननुभवी प्रॅक्टिशनर्स रूग्‍णासोबत भेटीच्‍या पहिल्‍या दिवसापासून प्रभावी केअर देण्‍यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्‍यांसह सुसज्‍ज होतील. हा उपक्रम विविध आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची काळजी आणि उपचाराच्‍या आवश्यक पैलूंबाबत ज्ञान देतो. यामध्ये उपदेशात्‍मक लेक्‍चर्स आणि प्रत्‍यक्ष प्रशिक्षणाचा समावेश आहे, जेथे रुग्णांचा इतिहास घेणे व शारीरिक तपासणी, आपत्कालीन इमेजिंग, ईसीजीबाबत माहिती, गंभीर परिस्थितीत प्रभावी संवाद, रक्‍त तपासणी व इतर तपासण्यांचे स्पष्टीकरण आणि वेळेवर व योग्य केअर सेवा वाढवण्यासाठी सोप्या निर्णय घेण्याच्या साधनांचा वापर यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

पायलट बॅचसाठी कल्‍याण-डोंबिवली परिसरावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे आणि त्‍यासाठी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, जेथे ९० हून अधिक नोंदणी, ७५ अननुभवी प्रॅक्टिनशर्स या पहिल्‍या बॅचमध्‍ये सक्रिय सहभाग घेण्‍याची अपेक्षा आहे.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (केडीएमसी) महापालिका आयुक्‍त माननीय श्री. अभिनव गोयल म्‍हणाले, ”फोर्टिसचे ‘कोड-क्‍यूआरटी’ सारखे उपक्रम प्रशिक्षणापेक्षा अधिक आहेत, ते हॉस्पिटल्‍स आणि दररोज समुदायांना सेवा देणाऱ्या केअरगिव्‍हर्सदरम्‍यान विश्वास, कौशल्‍ये व प्रबळ संबंध निर्माण करतात. हा उपक्रम फ्रण्‍टलाइन प्रदात्‍यांना केअरच्‍या महत्त्वपूर्ण पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये रूग्‍णाचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी, त्‍यांना स्थिर करण्‍यासाठी आणि पाठिंबा देण्‍यासाठी आवश्‍यक असलेली साधने व आत्‍मविश्वास देतो. ज्ञानाची देवाणघेवाण करत आणि सहयोगाने काम करत आम्‍ही दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा सर्वाधिक गरज असलेल्‍या समुदायांपर्यंत पोहोचण्‍याची खात्री घेत आहोत.”

उपक्रमाची माहिती देताना कल्‍याणमधील फोर्टिस हॉस्पिटलचे फॅसिलिटी डायरेक्‍टर डॉ. आशुतोष पांडे म्‍हणाले, ”फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणमध्‍ये आमचा विश्वास आहे की, आरोग्‍यसेवा समुदायासोबत सुरु होते. अनेक रूग्‍ण सुरूवातीला स्‍थानिक क्लिनिक्‍स किंवा नर्सिंग होम्‍समध्‍ये उपचार घेतात आणि त्‍या महत्त्वपूर्ण पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये अचूक निदान व योग्‍य उपचार मोठा बदल घडवून आणू शकतात. कोड-क्‍यूआरटीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही आरोग्‍यसेवा इकोसिस्‍टममधील प्रथम संपर्क साधल्‍या जाणाऱ्या क्लिनिशियन्‍सना उत्तम सेवा देण्‍यामध्‍ये गुंतवणूक करत आहोत. आमचा प्रत्‍येक रूग्‍णाला, ते कुठेही राहत असो किंवा त्‍यांनी कोणाशीही सल्‍लामसलत केलेली असो, वेळेवर व योग्‍य प्राथमिक केअर मिळण्‍याची खात्री घेण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम सुरूवातीपासून केअरची साखळी मजबूत करण्‍याचा आमचा मार्ग आहे आणि आम्‍हाला हे शक्‍य करणयसाठी समुदायामधील प्रॅक्टिशनर्ससोबत सहयोगाने काम करण्‍याचा अभिमान वाटतो.”

फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणला हा प्रशिक्षण उपक्रम राबवण्‍यास प्रेरित केलेल्‍या गोष्टीबाबत सांगताना फोर्टिस हॉस्पिटल्‍स मुंबईच्‍या ईसीएमओ प्रोग्रामच्‍या संचालक व कोड-क्‍यूआटी प्रोग्राम कन्‍व्‍हेनर डॉ. जुमाना हाजी म्‍हणाल्‍या, ”प्रगत केंद्रांवर पोहोचेपर्यंत बऱ्याच रुग्‍णांचे नुकसान होते. केअरच्‍या पहिल्या टप्प्यावर मर्यादित निदान जागरूकतेमुळे हा विलंब होतो. आम्‍ही कोड-क्यूआरटीच्‍या माध्‍यमातून ही तफावत दूर करू इच्छितो. आमचा रुग्णांना वेळेवर आणि योग्य केअर सेवा देण्‍याचा मनसुबा आहे.. आमचा समुदाय-स्तरीय डॉक्टरांवर खूप विश्वास आहे. आपण त्यांना लवकर धोक्याची लक्षणे ओळखण्यास सक्षम करू शकलो तर अधिक लोकांचे जीव वाचवू शकतो.”

मुंबईसह देशाच्‍या इतर भागांमध्‍ये विस्‍तार करण्‍याच्‍या योजना प्रगतीपथावर असण्‍यासह कोड-क्‍यूआरटी प्रबळ, अधिक कनेक्‍टेड आरोग्‍यसेवा सिस्‍टम निर्माण करण्‍यास मदत करत आहे, जी दररोज समुदायांना सेवा देणाऱ्या व्‍यक्‍तींसह सुरू होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »