महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क शिक्षण

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम होणार सुरू

DESK MARATHI NEWS.
नाशिक/प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि त्र्यंबकेश्वर – नाशिक येथील जॅग्वार्स डिफेन्स अकॅडमी यांच्यात आपत्ती व्यवस्थापन विषयक शिक्षणक्रमांच्या संयुक्त आयोजनासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार सहा आठवड्यांचा जनजागृती कार्यक्रम, सहा महिन्यांचा प्रमाणपत्र आणि एक वर्ष कालावधीचा पदविका असे तीन शिक्षणक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याप्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की सदर शिक्षणक्रम हे मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांतून उपलब्ध असतील. ६०% सैद्धांतिक व ४०% प्रात्यक्षिक अशी त्याची विभागणी राहील. प्रशिक्षण ऑनलाइन, ऑफलाइन आणि मिश्र पद्धतीने घेतले जाईल. या शिक्षणक्रमामुळे आपत्ती काळातील सजगता, प्रतिसाद, आणि सुरक्षिततेसंदर्भातील कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार असून रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जॅग्वार्स डिफेन्स अकॅडमीचे कर्नल ब्रम्हासिंग यांनी सदर शिक्षणक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार, आपत्ती प्रतिसाद, मॉक ड्रिल्स, फील्ड व्हिजिट्स आणि प्रकल्प कार्य यांचाही अनुभव दिला जाईल असे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विद्यापीठाचे पोर्टल वापरण्यात येईल. शिक्षणक्रम मंजुरी, विद्यार्थ्यांचे प्रवेश, मूल्यांकन, यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र किंवा पदविका प्रमाणीकरण यांची जबाबदारी विद्यापीठ सांभाळेल तर शिक्षणक्रम गुणवत्ता नियंत्रणापासून ते परीक्षांचे आयोजन, प्रशिक्षण साहित्य, आणि प्रशिक्षणाचे प्रत्यक्ष आयोजन जॅग्वार्स डिफेन्स अकॅडमी करणार आहे.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्र (सिका) संचालक डॉ. मधुकर शेवाळे, ग्रामीण विकास आणि उद्योजकता केंद्राचे संचालक प्रा. कैलास मोरे, जॅग्वार्स डिफेन्स अकॅडमीचे कर्नल प्रमोद नयनन, कॅप्टन आर्यमन सिंग व कमांडर रामकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »