महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश न्युजरूम

दिल्लीत दीपस्तंभ मनोबल केंद्राचा शुभारंभ दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

DESK MARATHI NEWS NETWORK.

नवी दिल्ली/प्रतिनिधी –  दीपस्तंभ फाउंडेशनद्वारे संचालित मनोबल प्रकल्प केंद्राचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी दिल्लीत झाला. या केंद्राद्वारे दिव्यांगअनाथट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जळगाव आणि पुण्यात यशस्वीपणे कार्यरत असलेला हा प्रकल्प आता राष्ट्रीय राजधानीतही सुरू झाला आहे. उद्घाटन समारोह कस्तूरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होतेतर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेदिव्यांगजन कल्याण विभागाचे सचिव राजेश अग्रवालदीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक-संचालक यजुर्वेंद्र महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर उपस्थित होते.

राजेश अग्रवाल यांनी नमूद केले कीगेल्या दहा वर्षांत दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य झाले आहे. स्वयंसेवी संस्थाराज्य आणि केंद्र सरकारचे विविध विभाग आणि खासगी क्षेत्रातील दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला आहेज्यामुळे सामाजिक संवेदनशीलता वाढली आहे.संस्थापक-संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले कीपुढील 25 वर्षांत कोणत्याही दिव्यांग किंवा ट्रान्सजेंडर विद्यार्थ्याला उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही. यासाठी त्यांच्या गरजेनुसार योग्य सुविधा आणि संसाधने उपलब्ध करणे आवश्यक आहे. सध्या केवळ 0.02% दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थी उच्च शिक्षण घेताततर उर्वरितांना संधी मिळत नाही. दीपस्तंभ संस्था स्वतंत्र भारताच्या शताब्दी वर्षापर्यंत सर्व क्षेत्रांत या समुदायांना अग्रस्थानी आणण्यासाठी कार्यरत आहे. त्यांनी जळगाव आणि पुण्यातील मनोबल केंद्रांची माहितीही यावेळी दिली.

या कार्यक्रमात यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मनू गर्ग (आयएएस)रवि राज (आयआरएस)अश्विनी परकाळे (आयपीओएस)श्रीतेज पटेल (आयआरएमएस)संपदा वांगेपुनीत गुप्ता (आयआयएम उदयपूर)तुषार चौगुले (एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर)कविता देसले (एमपीएससी)राकेश गुहा (बँक)विशाल शेलार (सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक)वीणा (पीएसआय) आणि प्रतीक जिंदाल (आयडीबीआय बँक) यांचा समावेश होता.ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेची विद्यार्थिनी माऊली आडकर हिनेजी दोन्ही हातांनी विकलांग आहेहारमोनियमवर ‘सारे जहाँ से अच्छा…’ हे गीत सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »