महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

चैत्रपालखी सोहळा: एकविरा देवीच्या पालखी सोहळ्याचा मान यंदा ठाणे जिल्ह्यातून कल्याणच्या कोळीवाड्याला

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळा येथील कार्ला गडावर आई एकविरा देवीच्या चैत्र पालखी सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे. यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्याचा हा मान ठाणे जिल्ह्यातून कल्याणच्या कोळीवाड्याला मिळाल्याने परिसरातील आगरी कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरवर्षी चैत्र महिन्यातील सप्तमीला आई एकविरा देवीचा भव्य असा पालखी सोहळा निघतो. ज्यामध्ये महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्तिभावूर्ण वातावरणात सहभागी होतात. तर एकविरा देवीची पालखी आणि या पालखी सोहळ्याचा मान मिळण्याला आगरी कोळी समाजामध्ये मोठे महत्व आहे. यंदा एकविरा देवीचा हा पालखी सोहळा 25 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता होणार असून त्याचा मान कल्याण कोळीवाड्याला मिळाल्याने कल्याणच्या आगरी कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कल्याण कोळीवाड्याकडून आई एकवीरा देवीच्या डोंगरावरती ही मिरवणूक निघणार आहे. आई एकविरा देवीच्या चार मानाच्या पालख्या असतात आणि ठाणे जिल्ह्यातून एकमेव कल्याण कोळीवाड्याला पालखीचा मान मिळतो.

कल्याणच्या कोळी -आगरी समाजाचे ऐतिहासिक महत्त्व…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि
इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या कल्याण शहराचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो. स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५७ साली कल्याण बंदरातून केली होती. दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदराची निर्मिती स्थानिक कोळी-आगरी समाजाच्या सहकार्याने झाल्याची ऐतिहासिक नोंद आहे.

कल्याण कोळीवाडा हा दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेला असून या कोळी-आगरी समाजाची कुलदेवता आई एकवीरा माऊली ही रेणुका मातेचा अवतार मानली जाते. दरवर्षी चैत्र महिन्यातील चैत्र सप्तमीला आई एकवीरा माऊलीचा भव्य पालखी सोहळा पार पडतो. अनेक वर्षांपासून कल्याण कोळीवाड्यातील कोळी बांधवांना या पालखी सोहळ्याचा मान मिळत असून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यासाठी कल्याणच्या कोळीवाड्यातील कोळीबांधव सज्ज झाले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »