वृद्धाला फेकले शंभर फूट खोल दरीत लुटीसाठी मित्राच्या मुलानेच दिला दगा
प्रतिनिधी. कल्याण– घरातील दागिने व रोख रक्कम लुटण्याच्या उद्देशाने रेल्वेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला त्याच्याच मित्राच्या मुलाने साथीदारासह बहाण्याने अपहरण करून माळशेज घाटाच्या शंभर फूट खोल दरीत दगडाने ठेवून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र वयोवृद्धाचे नशीब बलवत्तर म्हणून शंभर फूट खोल दरीत ढकलुनही जीव बचावला त्यामुळे हा खळबळजनक प्रकार समोर आला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या २४ तासातच आवळल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. शैलेश दत्तात्रय गायकवाड,वय ३५ भरत मच्छिंद्र गायकवाड वय ३४अशी गजाआड केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर त्यांचा एक.



