महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी ताज्या घडामोडी

द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

DESK MARATHI NEWS.
जळगाव/प्रतिनिधी  – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अर्थकारण समृद्ध करणाऱ्या द्राक्ष पिकासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्लास्टिक कव्हर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून द्राक्ष बागांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाकडून प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4,81,344 रुपये प्रति एकर खर्चाच्या 50 टक्के अनुदान म्हणजेच 2,40,672 रुपये प्रती एकर इतके अनुदान देण्यात येणार आहे. हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू असून, क्षेत्रमर्यादा प्रति लाभार्थी 20 गुंटे ते 1 एकरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश गारपीट आणि अवकाळी पावसापासून द्राक्ष बागांचे संरक्षण करणे, उच्च दर्जाच्या व निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, फळबागांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे असा आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये अंग्रीस्टँक फार्मर आयडी, 7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकचा पहिला पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र आणि चतुःसीमा नकाशा यांचा समावेश आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin

या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे. योजनेची सविस्तर माहिती कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in

संकेतस्थळावर तसेच नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयातून मिळवता येईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »