DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – तथागत प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा 2569 वा जयंती महोत्सव पंचायत बावडी रोड, बारा बंगला, ठाकुर्ली पूर्व येथील विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोर साजरा करण्यात आला.या प्रसंगी डॉ. संजय रामराजे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करण्यात आले, सुरेश व सायली उबाळे यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला,मेणबत्ती व अगरबत्ती ॲड. पंडित वाघ आणि गुलाबराव शिंदे यांनी प्रज्वलित केली,
या प्रसंगी बौद्धाचार्य- चिंतामण खंडागळे, जनार्दन महाडिक, प्रमोद कासारे यांनी बुद्ध वंदना घेतली,व धम्मचारी अनागारिक शिलरश्मी यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर प्रवचन दिले,या प्रसंगी के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल डॉ. निळकंठ सूर्यवंशी यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दगडू पगारे यांनी केला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश वडमारे, किशोर महाडिक, सतीश गायकवाड, गणेश वडमारे, राजाराम वाघमारे, प्रथम उर्फ पॅडी पी. व्हि, गोलू, शशी वडमारे, वसंत जोहरे, यांनी परिश्रम घेतले,



