महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी बिझनेस

मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग उत्सव- २०२३चे उदघाटन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी मुंबईतील खादी आणि ग्रामोद्योग मुख्यालयात खादी महोत्सव-23 या प्रदर्शनाचे उदघाटन, खादी  आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित कुमार, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले. खादी महोत्सव-23 हा उत्सव 27 जानेवारी ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मुंबईत साजरा होत आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार याप्रसंगी म्हणाले, की पंतप्रधान   मोदी यांनी देशातील जनतेला खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांची विक्री अपेक्षापेक्षा अधिक वाढली आहे. अध्यक्षांनी यावेळी पंतप्रधानांच्या “वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल” चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन, सर्वांना केले. अध्यक्षांनी केव्हीआयसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या प्रगतीची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रेरित केले. नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या अतुलनीय भारत पर्यटन महोत्सव (आयआयटीएफ,IITF)-2022 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 12 कोटी रुपयांची विक्री हे याचे प्रत्यक्षातील उदाहरण आहे. यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी खादी इंडियाच्या दिल्लीतील दुकानाने पुन्हा एकदा एका दिवसात 1.34 कोटी रुपयांच्या खादी विक्रीचा सर्वकालीन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तूंची एक लाख पंधरा हजार कोटींची विक्रमी विक्री झाली होती, या गोष्टीचाउल्लेख करणे अभिमानास्पद आहे.  पुढेही,3 ऑक्टोबर पासून आयोजित झालेल्या महिन्यात खादी फेस्ट-2022 मध्ये 3.03 कोटी रुपयांच्या विक्रीची नोंद झाली होती, असेही ते म्हणाले. सर्वांनी खादी फेस्टला व्यापक प्रसिद्धी देण्याचे सांगून देशातील गरीब विणकर, महिला आणि कसबी कारागीर यांच्या सन्माननीय कमाईसाठी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तू खरेदी करा, असे आवाहन केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी केले.त्यां नी पद्मश्री आणि संत कबीर पुरस्कार विजेत्या नागालँडमधील खादी विणकर श्रीमती नेहनुओ सोरी आणि केरळमधील पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ खादीतज्ञ व्ही पी प्पुकुट्टन पोडुवाल यांचे अभिनंदन केले. या खादी महोत्सवात खादी आणि ग्रामोद्योग संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाशी संलग्न देशाच्या विविध भागातील पीएमईजीपी युनिट्स त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी  सज्ज झाले आहेत.सुती खादी व्यतिरिक्त, खादी सिल्क, पश्मिना, पॉली वस्त्र, पटोला सिल्क, कलमकारी साड्या, कांजीवरम सिल्क, हलक्या वजनाच्या रेशमी मऊ सिल्क साड्या, टसर सिल्क, फुलकारी ड्रेस मटेरियल आणि खादीच्या कापडापासून बनवलेले इतर आकर्षक पोशाख, मधुबनी प्रिंट्स, सुका मेवा, चहा, काहवा, वनौषधीयुक्त सौंदर्य प्रसाधने ब्युटी आणि आयुर्वेदिक उत्पादने, मध उत्पादने, हाताने कागदाची उत्पादने, गृह सजावटीची उत्पादने, बांबू उत्पादने,चटया, कोरफडीची उत्पादने, चामड्याची उत्पादने तसेच इतर अनेक खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने उपलब्ध आहेत. Related Posts एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी’: हर्ष.

Read More
चर्चेची बातमी यशोगाथा

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील.

Read More
लोकल बातम्या

पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी वंजारी महिला शाखेतर्फे पारंपारिक गीतांचा कार्यक्रम

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, महिला शाखे तर्फे वंजारी भवन कल्याण येथे संक्रांत हळदीकुंकू.

Read More
पर्यावरण लोकप्रिय बातम्या

चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – आशियाई देशांमध्ये पुन्हा एकदा चित्ता या जंगली प्राण्याचे अस्तित्व वाढवण्यासाठीच्या सामंजस्य करारावर दक्षिण.

Read More
चर्चेची बातमी बिझनेस

राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्ली.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

पारसिक डोंगरातील डावा बोगदा खुला करण्याचा कार्यक्रम संपन्न

नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली – काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा.

Read More
थोडक्यात मनोरंजन

मराठी चित्रपटांच्या अर्थसहाय्य मंजूरी, दर्जा निश्चितीसाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी, चित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट.

Read More
कला/साहित्य ताज्या घडामोडी

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने ‘आर्याबाग’ वर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – मराठी भाषेला मिळालेली समृध्द संपदा वाढवूया तसेच अधिकाधिक उत्तम दर्जाचे साहित्य मराठी भाषेत निर्माण.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शोभा यात्रेने शुभारंभ

नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी – “या जगात आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत तर मानवी गुणांचा अंगीकार करु या.

Read More
चर्चेची बातमी तंत्रज्ञान

रूफ टॉप सोलरला वीज ग्राहकांची वाढती पसंती,१,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली.

Read More
Translate »