महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

उमेदवारीबाबत कल्याणात भाजपचा आदर्श वस्तुपाठ,माजी नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवाराने स्वतःहून सोडली उमेदवारी

DESK MARATHI NEWSNETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – एकीकडे स्वतःलाच उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला वेठीस धरण्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये घडले आहेत. असे असले तरी कल्याणच्या भाजपमध्ये मात्र पक्षाच्या माजी नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवाराने स्वतःहून आपल्या उमेदवारी सोडल्याचे आदर्श उदाहरण समोर आले आहे. कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 7 मध्ये घडलेल्या या प्रकाराचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक केले जात आहे.

“प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः” अशी भारतीय जनता पक्षाचे घोषवाक्य. या घोषवाक्याला साजेशी अशी वर्तवणूक कल्याणच्या भाजपमध्ये पहायला मिळत आहे. भाजपाचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी स्वतःला मिळालेली उमेदवारी युवा कार्यकर्ता शामल गायकर याच्यासाठी सोडली होती. संदीप गायकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 7 मध्ये भाजपकडून शामल गायकर यांच्यासह हेमलता नरेंद्र पवार आणि डॉ. पंकज उपाध्याय यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती.

मात्र ज्या व्यक्तीमुळे आपण आज भाजपात आहोत, ज्या व्यक्तीने आपल्याला पक्षाचे पहिले पद दिले, तीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात नसल्याची खंत डॉ. पंकज उपाध्याय यांना वाटत होती. त्यामुळे डॉ. पंकज उपाध्याय यांनी संदीप गायकर यांची भेट घेत या पक्षाने दिलेल्या उमेदवारीवर तुमचाच अधिकार असल्याचे सांगितले. अखेर महत्प्रयासाने डॉ. उपाध्याय यांनी गायकर यांची समजूत काढली आणि भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनाही आपल्याऐवजी संदीप गायकर यांना उमेदवारी देण्याची विनंती केली.

डॉ. पंकज उपाध्याय यांनी केलेली विनंती आणि दाखवलेले मनाचे औदार्य पाहता पक्षानेही मग संदीप गायकर यांना अधिकृत उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिला. परंतु तांत्रिक कारणामुळे तो ग्राह्य धरला न गेल्याने संदीप गायकर हे आता भाजप पुरस्कृत म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनीही याबाबत पत्र काढून संदीप गायकर हे भाजपचे पुरस्कृत उमेदवार असल्याचे नमूद केले. संदीप गायकर यांच्या या प्रवेशामुळे कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 7 आणखी मजबूत झाले असून महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया युवा उमेदवार शामल गायकर यांनी दिली आहे.

त्यामुळे संदीप गायकर पुन्हा एकदा नगरसेवकाच्या रिंगणात उतरले असून पक्षासाठी आणि संघटनेच्या हितासाठी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्याचा हा प्रसंग भाजपच्या कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

भाजपातील अंतर्गत एकजूट, कार्यकर्त्यांमधील आपुलकी आणि पक्षनिष्ठेचे हे चित्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी नक्कीच सकारात्मक संदेश देणारे ठरेल अशी प्रतिक्रिया राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »