महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क पोलिस टाइम्स

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती

DESK MARATHI NEWS NETWORK.

ठाणे/प्रतिनिधी – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), ठाणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांनी संजय गोविलकर यांच्याकडून या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. संजय गोविलकर यांच्या कार्यकाळातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिशय धाडसी कारवाया केल्या.यापूर्वी सोनवणे हे महाराष्ट्र पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. त्यांच्याकडे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांचा तपास करण्याचा मोठा अनुभव आहे.

त्यांनी नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उप अधीक्षक पदावर धडाडीने काम केले आहे, ज्यामुळे त्यांना भ्रष्टाचारविरोधी मोहिमांची सखोल माहिती आहे. तसेच सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, नागपूर शहर, मुंबई शहर, नाशिक शहर तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही उत्कृष्ट सेवा बजावली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सोनवणे यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येईल आणि लाचखोरीला रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांना बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »