DESK MARATHI NEWS NETWIRK.
बसवंत पिंपळगाव/प्रतिनिधी – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारी बसवंत पिंपळगावची पहिलीच नगरपरिषद निवडणूक यंदा होत असून, या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या तयारला वेग दिला आहे. नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदेमुळे नागरी प्रशासनाची नवी पायरी गाठणाऱ्या बसवंत पिंपळगावमध्ये मतदारांमध्येही उत्सुकता वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शहरात उत्साहवर्धक एन्ट्री घेतली असून, प्रभाग क्र. ६ मधून तरुण, उच्च शिक्षित आणि सामाजिक भान असलेल्या किरण फकिरा गांगुर्डे यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे. स्थानिक पातळीवर गांगुर्डे हे तरुण वर्गातील लोकप्रिय नाव असून, त्यांच्या उमेदवारीची चर्चा गावोगाव सुरू आहे.
किरण गांगुर्डे हे उच्च शिक्षित असून, सामाजिक कामाचा त्यांना भान आहे. वंचित घटक, दुर्बल कुटुंबे, शैक्षणिक समस्या, महिलांच्या अडचणी आणि युवकांच्या रोजगाराच्या संधी या विषयांवर काम करण्याचा त्यांचा मानस आहे. त प्रभागात त्यांची चांगली ओळख आणि नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. निवडणुकीत नव्या पिढीचा सहभाग वाढावा, ताज्या धर्तीचे नेतृत्व पुढे यावे, या हेतूने वंचित बहुजन आघाडीने त्यांना संधी दिली असल्याचे पक्षातील वरिष्ठांकडून सांगितले जाते.
प्रभाग क्र. ६ हा विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरातील नागरिकांनी भरलेला भाग आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नाल्यांची दुरुस्ती, सार्वजनिक सोयीसुविधा, महिलांसाठी सुरक्षित सुविधा आणि युवकांसाठी विकासाच्या संधी या समस्या येथे कायम आहेत. या सगळ्या प्रश्नांना प्रामाणिकपणे भिडून त्या समस्यांचे समाधान करण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे, असा मतदारांचा सूर आहे.याच मुद्द्यावर किरण गांगुर्डे यांची मोहीम उभी राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणूक जाहीर होताच त्यांनी नागरिकांशी थेट संपर्क सुरू केला आहे. घराघरात जाऊन समस्यांची माहिती घेत, त्यांचे मत ऐकून त्यांच्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
किरण गांगुर्डे म्हणाले, “बसवंत पिंपळगावची पहिलीच नगरपरिषद, त्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक आहे. या नगरपरिषदेत कोणते नेतृत्व पुढे जाते यावर पुढील अनेक वर्षांचा विकास अवलंबून आहे. वंचित, शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांचा आवाज परिषदेत पोहोचवणे हे माझे प्राथमिक ध्येय आहे. समाजाने दिलेला विश्वास कामातून परत करू.” अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
प्रभागातील तरुण मतदार वर्गदेखील अशा नव्या नेतृत्वाचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. अनेक युवकांनी त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला असून, “नवे नेतृत्व – नवी दिशा” असा घोष पक्षाने दिला आहे.
पहिल्या नगरपरिषद निवडणुकीमुळे सर्वांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असताना, वंचित बहुजन आघाडीचा हा तरुण, उच्च शिक्षित चेहरा प्रभाग क्र. ६ मधील लढत अधिकच रोचक बनवणार आहे. आगामी काही दिवसांतील प्रचारयुद्धाने या निवडणुकीचा रंगतदार माहोल आणखी वाढण्याची शक्यता आहे.



