महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क शिक्षण

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा, माजी विद्यार्थी संघाचे ५ लाख सदस्य

DESK MARATHI NEWS.

नाशिक/प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाने पाच लाख माजी विद्यार्थी सदस्य नोंदणीचा टप्पा पार केला आहे. दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी स्थापना झालेल्या या माजी विद्यार्थी संघाकडे गत पावणेपाच वर्षांपासून आजतागायत तब्बल ५ लाख ६ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी सदस्यता नोंद केलेली आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे सर्वाधिक माजी विद्यार्थी सदस्य नोंदणी असलेले देशातील पहिले राज्य विद्यापीठ ठरले आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेवून वाटचाल करणाऱ्या विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

 सन १९८९ मध्ये मुक्त विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर त्यातून आजतागायत सुमारे ५५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध शिक्षणक्रमांच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. सन २०२० मध्ये विद्यापीठात माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. त्यात सामील होण्यासाठी विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना www.ycmoualumni.org हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले. त्यात त्यांनी कोणत्या विद्याशाखेतून कोणता शिक्षणक्रम कधी पूर्ण केला, सध्या ते कोणत्या आस्थापनेत कोणत्या पदावर काम करत आहेत, या माहितीसह सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले होते. पाठोपाठ तंत्रज्ञानाचा व विविध समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत माजी विद्यार्थ्यांचे संघठन वाढविण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या निरनिराळ्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे माजी विद्यार्थी संघाच्या सदस्य संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांची विदा – माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विद्यापीठाने यापूर्वी उल्लेखनीय माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा पुस्तकरूपात प्रसिद्ध केल्या आहेत. विद्यापीठ दृकश्राव्य विभागाचे डॉ. संतोष साबळे हे स्थापनेपासून या माजी विद्यार्थी संघाचे सरचिटणीस म्हणून प्रमुख कार्य करत आहेत.  

  विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जगभरातील माजी  विद्यार्थांचा मेळावा आयोजित करण्याचा मनोदय असल्याचे या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची नोंदणी वाढविण्यासाठी मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, उपाध्यक्ष डॉ. गोविंद कतलाकुटे, खजिनदार कविता देव, डॉ. नितीन ठोके, डॉ. प्रकाश देशमुख, माजी विद्यार्थिनी धावपटू कविता राऊत, राहुल खैरनार आदींचे सहकार्य लाभले आहे. दरम्यान, मुक्त विद्यापीठातून कोणताही शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपरोक्त संकेतस्थळास भेट देवून आपली नोंदणी करावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

विविध क्षेत्रात कार्यरत विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांची नाळ विद्यापीठाशी जोडली जावी, त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी, विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, नवीन विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांचा फायदा व्हावा या उद्देशाने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. त्याची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी आहे. पाच लाख माजी विद्यार्थी सदस्य नोंदणीचा टप्पा पार झाल्याबद्दल मनस्वी आनंद आहे. आगामी काळात विद्यापीठातर्फे माजी विद्यार्थ्यांसाठी भरीव उपक्रम राज्याच्या विविध भागात राबविण्यात येतील.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »