महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य न्युजडेस्क

कल्याणच्या वसंतव्हॅली प्रसूतीगृहात सुसज्ज एनआयसीयू होणार सुरू,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्याला यश

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण मध्ये दोन महिन्यांपूर्वी एक नवजात बालकाचा कल्याण पश्चिमेत वसंत व्हॅली प्रसूतीगृहात मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली होती. त्या बालकांच्या पालकांनी NICU सुसज्ज नसल्या मुळे आमच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पालिका प्रशासनाला जबाबदार धरले होते. त्यानंतर या प्रकरणात लक्ष घालत प्रसूतीगृहात सुसज्ज एनआयसीयू सुरू करण्यासाठी  कल्याण ग्रामीण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख अमित कोळेकर यांनी सतत  पाठपुरावा केला आणि अमित कोळेकर यांच्या पाठपुराव्याना यश आले आहे.

त्यांना पालिकेच्या आरोग्य विभाकडून एक पत्र प्राप्त होऊन त्यात प्रसूतीगृहात नवजात अतिदक्षता विभाग सुरू करणीसाठी निविदा काढल्याचे म्हंटले आहे. शहरातील मातांना व नवजात बाळांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. वसंत व्हॅली, कल्याण पश्चिम येथील प्रसूतीगृहात नवजात अतिदक्षता विभाग (NICU) लवकरच सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.

शिवसेनेचे कल्याण ग्रामीण शहरप्रमुख अमित संभाजी कोळेकर यांच्या मागणीच्या अनुषंगाने पालिकेकडून या बाबतची कार्यवाही करण्यात आली आहे. कोळेकर यांनी दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या पत्राच्या संदर्भात पालिकेकडून अधिकृत प्रतिसाद देण्यात आला आहे.पालिकेने वसंत व्हॅली प्रसूतीगृह बाह्यसंस्थेमार्फत १० वर्षांसाठी चालविण्यासाठी फेरनिविदा प्रक्रिया सुरू केली असून, त्यामध्ये ५० जनरल बेड, ५ अतिदक्षता विभाग (ICU) बेड आणि १० बेडचा नवजात अतिदक्षता विभाग (NICU) समाविष्ट करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने  कळवले की, संबंधित ठिकाणी लवकरच सुसज्ज ‘NICU’ विभाग सुरू करण्यात येईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि नवजात शिशूंच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होतील.

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे कल्याण ग्रामीण शहरप्रमुख अमित संभाजी कोळेकर यांनी सांगितले आहे की कल्याणच्या पालिका रुग्णालयात  एनआयसीयूची सुविधा उपलब्ध नाही त्याच बरोबर गरीब गरजू रुग्णांना खाजगी रुग्णालयातील  एनआयसीयूचा खर्च परवडण्यासारखा नाही. त्यातच आमच्या पाठपुराव्याला यश येऊन पालिका प्रसूतिगृहात जर एनआयसीयू सुरू होऊन गरीब गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल आम्ही समाधानी आहोत. त्याच बरोबर त्यांनी पालिका प्रशासनाला एनआयसीयू लवकरात लवकर रुग्णाच्या सेवेत दाखल करण्याची विनंती केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »