DESK MARATHI NEWS.
भिवंडी/प्रतिनिधी – चुरशीच्या झालेल्या भिवंडी वकील संघटनेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे अँड किरण चन्ने यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.अध्यक्ष पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत अँड किरण चन्ने यांनी अँड मनजीत राऊत यांचा २०९ मतांनी पराभव केला आहे.अँड किरण चन्ने यांना ५७३, अँड मनजीत राऊत यांना ३६४ तर तिसरे उमेदवार अँड.सुनील पाटील यांना अवघ्या ४८ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत कार्यकारी मंडळावर उपाध्यक्ष पदी अँड.सुधीर भोईर,सचिव पदी अँड.प्रदीप मते,सह सचिवपदी अँड.अफिफ मोमीन,खजिनदारपदी अँड.कल्पेश ठाकूर हे निवडून आले असून बार असोसिएशन सदस्यपदी अँड.प्रमोद भालेकर,अँड.चांदबी मुजावर,अँड.अतुल भालेराव,अँड.अनिल राठोड,अँड.लखन कांबळे तर महिला प्रतिनिधी म्हणून अँड.सपना भगत या विजयी झाल्या आहेत.अँड.किरण चन्ने यांच्या विजयानंतर न्यायालय परिसरात रात्री उशिरा वकिलांसह समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.
भिवंडी वकील संघटनेच्या निवडणुकीत मिळविलेला विजय हा परिवर्तन शील विचारांचा विजय असून सर्व वकिलांनी केलेल्या सहकार्यातून ही शक्य झाले असून,सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे काम पुढे करत राहणार अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष अँड.किरण चन्ने यांनी दिली आहे.