नेशन न्यूज मराठी टीम.
वाशिम/प्रतिनिधी – पिक विम्याची २५ टक्के रक्कम दिवाळी पूर्वी शेतकर्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा दिवाळीच्या दिवशी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी वैजनाथ येथील निवासस्थानी मोर्चा काढू असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम पाटील ईढोळे सतीष ईढोळे यांनी मूख्यमंत्री, एकनाथ शिंदे व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे दिला.
वाशिम तालुक्यातील अडोळी सर्कल सह वाशीम तालुक्यातील शेतकरी आस्मानी व सुलतानी संकटामुळे हैराण आहे, पाऊसाची उघडीप,एलो मोझाकचा सोयाबिन पिकांवर आलेला धोका , हुमणी अळीचा प्रादुर्भाव त्यामुळे तोंडी आलेला घास हातचा गेला जेमतेम उत्पादन खर्च निघेल एवढे ही सोयाबिन होइल याची खात्री नाही, त्यामुळे बळीराजाची दिवाळी अंधारात जाणार यात काही शंका नाही म्हणून शासनाने दिवाळीपूर्वी पिक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा दिवाळीच्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या घरांवर मोर्चा काढला जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राम ईढोळे सतिष ईढोळे यांनी शासनास दिला आहे,
वाशिम तालुक्यातील अडोळी सर्कल सह वाशीम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन वर पिवळा मोजॅक पडल्याने उत्पन्नात कमालीची घट होतांना शेतकऱ्यांना दिसत आहे. शेतकरी अगोदरच पाऊस कमी झाल्यामुळे परेशान झाला असून भविष्यात रब्बीसाठी पिकाला पाण्याची कमतरता भासणार असून त्या शक्यतेने आणि हुमणीअळीचा प्रादुर्भाव व पिवळा मोजॅकच्या रोगामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे येणारे दिवस कसे जातील व कमी उत्पन्नाच्या भरोशावर जीवन कसे जगता येईल त्यामुळे उपासमारीच्या दिशेने शेतकऱ्याची वाटचाल होत आहे शासनाने शेतकऱ्यांना 25% विमा अग्रिम मिळणार असल्याचे जाहीर केले परंतु तो कधी मिळणार या आशेने शेतकरी वाट पाहत आहे तो जर दिवाळीच्या आत मिळाला तर दिवाळी मात्र चांगली होणार व समाधान होईल, शेतकऱ्याची दिवाळी होईल. अशी शेतकऱ्यांना आशा वाटते याबाबत स्वाभिमानीचे राम ईढोळे व सतीश इढोळे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडे या निमित्ताने मागणी केली आहे, दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना अग्रीम विमा मिळाला पाहिजे जर दिवाळीच्या आत हा अग्रिम विमा मिळाला नाही तर कृषीमंत्र्याच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दिवाळीच्या दिवशी मोर्चा नेला जाईल असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
कोट
शेतकर्यांची दिवाळी शासनाच्या उदासीन धोरणामुळे अंधारात जाणार असेल तर त्यांनी जर पिक विमा रक्कम दिवाळी पूर्वी शेतकर्यांच्या खात्यावर जमा न केल्यास कृषी मंत्र्यांनाहि दिवाळी सूखात खाऊ देणार नाही त्यासाठी आम्ही त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून देण्यात आला.



