नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – पवित्र भंडारा उधळल्यामुळे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेचा धनगर समाज बांधवांकडून जोरदार निदर्शने होत आहेत. शासन दरबारी धनगर समजाच्या मागण्या मांडण्यासाठी अमरावती येथून मोर्चा काढण्यात येनार आहे.
संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मेंढपाळ धनगर समुदायास स्थैर्य देण्याकरिता योजना कार्यान्वित करणे या मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने धनगर समाजाकडून २ ऑक्टोबरला अमरावती येथून ‘भंडारा उधळीत मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा ३ तारिखला मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे.



