महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे थोडक्यात

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित

नेशन न्यूज मराठी टीम.

मुरबाड/संघर्ष गांगुर्डे – स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना शहीद झालेले आझाद दस्त्याचे वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचा हौतात्म्यदिनी सिद्धगडावर आज जागर करण्यात आला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित केल्यानंतर शेकडो ग्रामस्थांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. या वेळी मुलांनी गायलेली राष्ट्रभक्तीपर गीते व पोवाड्याने वातावरण देशप्रेमाने भारून गेले होते.

ब्रिटीशांबरोबर लढा देत असताना सिद्धगड परिसरात वीर भाई कोतवाल व वीर हिराजी गोमाजी पाटील यांना वीरमरण आले होते. ते हुतात्मा झाल्याच्या ठिकाणी दरवर्षी २ जानेवारी रोजी पहाटे हजारो मुरबाडवासियांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. सिद्धगड स्मारक समितीच्या वतीने दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आजही कार्यक्रम उत्साहात पार पडला.

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तत्पूर्वी दोन्ही हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून हुतात्म्यांना सलामी दिली गेली.

या कार्यक्रमात क्रांतीवीरांच्या गौरवाचे पोवाडे गायले गेले. त्याचबरोबर शाळकरी मुलांसह ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागवली. या वेळी वक्तृत्व स्पर्धा व गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेत्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. हुताम्यांच्या बलिदानापासून मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांनी ही अनोखी परंपरा निर्माण केली. त्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाडवासियांचे कौतुक केले. त्याचबरोबर वीर भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील यांच्या कार्याचे स्मरण करून प्रत्येकाने देशहिताच्या दृष्टीकोनातून कार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच सरकारी अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »