महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत

नेशन यूज मराठी टिम.

ठाणे – ठाणे येथील जिल्हा सेवा प्राधिकरणामार्फत डिसेंबर, मार्च आणि मे या महिन्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आतापर्यंत १ लाख ५८ हजार ७०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली. दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा व तालुका न्यायालयाच्या ठिकाणी शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता राष्ट्रीय लोकन्यायालय घेण्यात येईल. पक्षकारांनी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी या राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री यांनी केले आहे.

न्यायालयातील सर्व प्रलंबित दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये दिवाणी दावे, बँकांची कर्ज वसुली प्रकरणे, कौटुंबिक कलहाची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, विद्युत महामंडळाची वसूली प्रकरणे, राज्य परिवहन महामंडळाची प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे इ. व फौजदारी तडजोडजन्य प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे (कलम १३८ एन. आय अॅक्ट) तसेच दाखलपूर्व प्रकरणे, दुरध्वनी देयक प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत, विद्युत महामंडळ इ. चा समावेश आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »