महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मनोरंजन लोकप्रिय बातम्या

झिंग चिक झिंग’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’वर!

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट आता ०४  मार्च २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर  प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणार आहे.

एका संवेदनशील शेतकऱ्यावर सावकारी कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे. परिस्थितीने गांजलेला हा शेतकरी आपला संपूर्ण आत्मविश्वास हरवून बसला असून जगासमोर मान उंच करून चालणं त्याच्यासाठी लज्जास्पद झालं आहे. हा अगतिक शेतकरी कर्जाचा डोंगर फोडून काढेल की त्याखाली दबून मरेल, हे चित्रपटात कळणार आहे. नितीन नंदन यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून चित्रपटात भरत जाधव, माधवी जुवेकर, संजय मोने आणि दिलीप प्रभावळकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत.

“२०१० च्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारासोबतच आणखी बऱ्याच पुरस्कारांनी पुरस्कृत झालेला चित्रपट अल्ट्रा झकासच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना आनंद गगनात न मावणारा आहे. अशाच प्रकारचे अनेक चित्रपट आणून प्रेक्षकांना नेहमी मनोरंजित ठेवण्याचा आमचा सकारात्मक अट्टहास आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »