महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी मनोरंजन

‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर लवकरच कन्नड चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’ या नावाने मराठीत पहायला मिळणार आहे. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

एकाच शाळेत आणि ट्यूशनला जाण्यापासून संजय आणि लीला एकत्र मोठे झाले आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विवाह संस्था उघडतात. तेव्हा त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या एका लग्नाच्या  नियोजनाची संधी मिळते. या लग्नादरम्यान १०० कोटींचा एक रहस्यमय गोंधळ उद्भवतो आणि गोष्टीला एक अनपेक्षित वळण मिळतं. हे वळण नेमकं कुठे जाऊन पोहचणार, हे चित्रपटात कळणार आहे.चित्रपटाचे विलक्षण दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक सौरभ कुलकर्णी यांनी केले असून अंजन भारद्वाज आणि दिशा रमेश या जोडीचे या चित्रपटातून सुपरहिट पदार्पण झाले आहे.

“दाक्षिणात्य चित्रपटांतून दाक्षिणात्य संस्कृती आणि खास कला आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळते.चित्रपटांमधून विविध संस्कृतींची देवाण घेवाण व्हावी, आणि चांगली कलाकृती भाषेच्या बंधनात अडकून न राहता प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Related Posts
Translate »