नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – एनआरसी कॉलनी मधील एनआरसी वसाहतीच्या इमारतींना केडीएमसी कडून धोकायक असल्याची नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. यामुळे तेथील रहिवासी आक्रमक झाले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून कामगारांचा थकीत वेतन देण्याचा प्रश्न प्रलंबित असतानाच आता कामगारांच्या घरांवर देखील धोकादायकच्या नोटीस लावण्यात आल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याच्या निषेधार्थ एनआरसी कॉलनीतील रहिवाशांनी केडीएमसी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
यावेळी वसाहतीतील इमारती अदानी ग्रुपनेच दुरुस्त करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी आ. विश्वनाथ भोईर यांनी एनआरसी कामगारांच्या थकित देणे व घरा बाबतचा प्रश्न येत्या अधिवेशनात मांडणार तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.



