महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
आरोग्य न्युजडेस्क

कल्याणात उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू,पालिका रुग्णालयाच्या हलगर्जी पणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी – पुण्यात मंगेशकर हॉस्पिटल मध्ये प्रसूती दरम्यान महिलेला दाखल करून न घेतल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुनः एकदा रुग्णालयाच्या हलगर्जी पणा मुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन साठी दाखल करण्यात आलेल्या एका तीस वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना  सोमवारी  दुपारच्या सुमारास घडली.या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील हलगर्जी पणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मयत महिलेचे नाव शांती देवी  मौर्या (३०)असे आहे.
कल्याण पूर्वेतील खडेगोलवली परिसरात राहणारी महिला शांती देवी मौर्या(३०) ही गेल्या चार दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवारी पासून तिच्या पोटात दुखत असल्याने तिला नजीकच्या कोळसेवाडी परिसरातील पालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या महिलेची रुग्णालयात दाखल केल्या पासून प्रकृती खराब असलेल्याने तिच्या शरीरात रक्त चढविण्यात आले  होते .तीन मुल असल्याने पुन्हा ती गर्भवती राहिल्याने गर्भपात करून कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन करण्यासाठी तिची सोमवारी प्रकृती सुधारल्याने गर्भपात व कुटुंब नियोजन ऑपरेशन करण्यासाठी ओटी मध्घे घेऊन  उपचार सुरू असताना अचानक पणे तिची  प्रकृती खालावल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबीयांना पालिकेच्या हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सांगितले असता तिच्या नजीकच्या खाजगी रुग्णालय अमेय हॉस्पिटल मध्ये रुग्णवाहिके मधून दाखल करण्यासाठी नेत असताना खाजगी रुग्णालयात दाखल करण्या पूर्वी तिचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
या घटने प्रकरणी मयत महिले पती अखिलेश मौर्या यांनी सांगितले की माझी पत्नी शांती देवी  हिला मुतखड्याचा त्रास असल्याने तिच्या पोटात सारखे दुखत असे त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागातील आशा सेविका आमच्या परिसरात सर्वे साठी आल्या असता त्यांना माझ्या पत्नीने पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने त्यांनी मूतखड्याच्या आजारावर उपचारासाठी दाखल केले असता शांती देवी  गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. पहिले तीन मुल असताना गर्भ पात करून कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन करण्याचे ठरले असता तिचे सोमवारी ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये नेले असता तिच्या वर उपचारा पूर्वी प्रकृती खालावल्याने तिला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी आम्हाला सांगितले नजीकच्या खाजगी रुग्णालय अमेय हॉस्पिटल मध्ये रुग्णवाहिके मधून दाखल करण्यासाठी नेत असताना खाजगी रुग्णालयात दाखल करण्या पूर्वी तिचा मृत्यू झाला हा मृत्यू पालिकेच्या हलगर्जी पणा मुळे झाल्याचाआरोप मयत महिलेचा पती अखिलेश व त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×