महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

चाळीस वर्षें दिली, आणखी एक महिना देऊन पाहू- मनोज जरांगे पाटील

नेशन न्यूज मराठी टीम.

जालना / प्रतिनिधी – मराठा समाज आरक्षण आंदोलनातील उपोषणकर्ते मनोज दरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरांगे पाटील म्हणाले, सरकारला वेळ दिला तरी आंदोलन सुरुच राहणार.गाड्या आडवल्याने आरक्षण मिळणार नाही. आपली लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. चाळीस वर्षें दिली, आणखी एक महिना देऊन पाहू.

आरक्षणाचे पत्र मिळेपर्यंत थांबणार नाही. मी चर्चा करतो पण निर्णय तुमच्या हातात. आंदोलकावरचे सर्व गुन्हे मागे घ्यावे व ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई करा. आंदोलन संपवले तर आपल्याला गुंडाळून टाकतील.मराठा आरक्षणासाठी झिजतोय मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही.जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझं घर, लेकरांचे तोंड पाहणार नाही.

सरकारला आता एक महिन्याचा वेळ दिला आहे. जातीची बदनामी नको म्हणून वेळ दिला आहे. जर आरक्षण नाही तर महाराष्ट्राची बॉर्डर सुद्धा क्रॉस करण्याची ताकद आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ आणि खा. उदयनराजे भोसले हे सगळे जालना येथे उपोषण सोडताना आले पाहिजे. सरकार आणि आमच्या मध्ये दोन्ही राजे पाहिजे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »