महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

देशभरात घरफोडी करणार्‍या अट्टल आरोपीला वर्धा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

वर्धा/प्रतिनिधी – महाराष्ट्रात चोरी ,घरफोडी (Burglary) करणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. ज्या नेहमी चोरीच्या संधीत सर्वत्र फिरत असतात. यांची नजर सतत बंद घरांवर असते. घरफोडी करणाऱ्या अशाच एका अट्टल आरोपीला वर्धा (Vardha) पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून ७ लाख २० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वर्धा, सावंगी पोलिस ठाण्यात नोंद असलेले घरफोडीचे चार गुन्हे उघड करण्यात आले आहे.

आरोपीवर घरफोडी, चोरी, फसवणूक, घरफोडीचा प्रयत्न, जबरी चोरी आदी ९३ गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नोंद आहेत. आरोपीचे नाव प्रशांत काशीनाथ करोशी आहे. आरोपी हा कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील इस्कुर्ली गावातील रहिवासी आहे. प्रशांतने देशातील वेगवेगळ्या राज्यात, विविध जिल्ह्यात जावून त्याने चोरी केली आहे. हैद्राबाद येथील उच्चभ्रु वस्तीत जावून चोरी करण्याचा त्याचा प्लॅन होता. बर्‍याच बँक लॉकरचीही मॅपवर प्रशांतने रेकी केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी प्रशांत करोशी याने यु ट्यूबवर (You tube) व्हिडीओ बघून त्याने चोरीचे प्रशिक्षण घेतले आहे. आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी दिली.

Related Posts
Translate »