Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याणात तृतीयपंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेत मतदान जनजागृती

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24- कल्याण लोकसभा मतदार संघातील, 142 कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी केल्या जाणाऱ्या विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमाच्या अनुषंगाने 142- कल्याण पूर्वचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक ) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली विठ्ठलवाडी परिसरातील खडेगोळवली येथील किन्नर अस्मिता या तृतीयपंथीयांच्या संस्थेत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदार जनजागृतीपथकाने तृतीयपंथीय समुदायात मतदानाचा हक्क व त्याचे महत्व पटवून दिले.

सदर ठिकाणी तृतीयपंथी मतदारांनी आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा अशा घोषणा करीत,आम्ही सर्व मतदान करणार या शब्दात उपस्थितांना आश्वासित केले.

यासमयी स्वीप टिमचे कर्मचारी- स्टुडंट ऑयकान प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, मिडीया टिमचे उमेश यमगर, निलेश चव्हाण,अदिती पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X