महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी बिझनेस

पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली –  जनावरांचा विम्याचा निधी, राष्ट्रीय पशुधन मिशनअंतर्गत राज्याकडून येणा-या  प्रस्तावास मंजुरी आणि परदेशी संकरित गायी आणि बक-यांना आयातीबाबत परवानगी मिळावी अश्या पशुसंवर्धनविषयी आज  महत्वाची बैठक केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला  आणि महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यात पार पाडली.मंत्री केदार यांनी आज केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांची कृषी भवन येथे भेट घेतली. बैठकीत राज्याशी निगडीत  पशुसंवर्धन विषयावर सविस्तर चर्चा झाली.  

 राज्यातील जनावरांच्या विमासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आलेला आहे. केंद्राकडून या प्रस्तावास मंजुरी मिळावी तसेच याबाबतचा निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून मिळावा, अशी मागणी मंत्री केदार यांनी यावेळी केली.

यासह राष्ट्र पशुधन मिशनमध्ये विविध जाती विकसित करण्याबाबत  प्रस्तावास मंजुरी तसेच या मिशनअंतर्गंत मिळणारा  निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणीही केली. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पशुच्या विविध जातीचे संकर विकसित करण्यास गती येईल, असेही मंत्री केदार यांनी सांगितले.

  भारतीय गीर जातीच्या गायींवर ब्राझीलमध्ये  संशोधन होऊन अध‍िक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकर‍ित गीर गाय दिवसाला 25-27 लीटर दूध देते.  या गीर जातीच्या गायी भारतात आणून शेतक-यांना  द्याव्यात जेणे करून शेतक-यांच्या जोडधंधा म्हणून असणा-या दुग्ध व्यवसायाला भरभराट येईल.  तसेच यासोबतच सानेन या जातीच्या बक-या ज्या दिवसाला 10-12 लीटर दूध देतात. या बक-या महाराष्ट्रात आणण्याची परवानगी मिळावी, जेणे करून  बक-यांच्या दुधातून रोजगार वाढीसाठी मदत होईल, अशी मागणीही मंत्री केदार यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली.  या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा, इजराइल येथे मोठया प्रमाणात आहेत पशुंच्या आयातीसंदर्भात परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालयाकडून काही परवानग्यांची आवश्यकता असते, त्या मिळण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी मंत्री केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »