Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
राजकीय

वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत होत असून, ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांचा विजय निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वंचित बहुजन आघाडी शाहू महाराज छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे. वंचित बहुजन आघाडी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवते आणि या विचारधारेचे प्रमुख समर्थन करते. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे. त्यामुळे आम्ही हा जाहीर पाठींबा त्यांना दिल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X