नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली / प्रतिनिधी –
नागरिकांना सर्व सुविधा असलेलं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारा, महिला प्रसूतीसाठी 50 खाटा ऐवजी 250 खाटा असल्या पाहिजे, त्याच इमारतीत डायलेसिस थॅलेसिमिया आजारासाठी स्वतंत्र 50 ते 50 खाटाचे कक्ष पाहिजे .डोंबिवलीतील सूतिका प्रसूती गृह खाजकीकरण रद्द करा. ह्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी डोंबिवलीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व मा. डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके व मा. उपाध्यक्ष राजु काकडे यांनी केले.
प्रमुख उपस्थिती ठा. जी. महासचिव रेखाताई कुरवारे, डों. महासचिव वैषाली कांबळे जिजाभाऊ गोंडगे सामाजिक कार्यकर्ते, सुरेश छापरवाल, नंदाताई ढेकळे,सह्याद्री सामाजिक संघटनेचे नवनाथ मोरे,स. वि. आ. चे राजु खरात उपस्थित होते.
आयोजक ॲड.मिलिंद साळवे अर्जुन केदार, बाजीराव माने, अशोक गायकवाड, दीपक भालेराव,लक्ष्मण हजारे, प्रशांत टेकुळे, एजाज खान, नंदू पाईकराव, निलेश कांबळे विलास मोरे, संतोष खंदारे, दत्ता शेळके, अक्षय वाटुडे,ज्ञानू अंबोरे,पांडवीर साहेब,योगेश सुतार,अतिश जोंधळे, सचिन पठाडे,संदीप साळवेप्रभाकर मोरे ,महिला मंडल, कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.