महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ऑटो ताज्या घडामोडी

हिरवा झेंडा दाखवत देशातील पहिल्या हरित हायड्रोजन इंधन सेल बसचे अनावरण

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – देश सक्षम होण्याच्या दृष्टीने अजून एक यशस्वी पाऊल टाकले गेले आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन सेल बसचे उद्घाटन दिल्ली येथे केले गेले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत कर्तव्य पथ येथून पहिल्या हरित हायड्रोजन इंधन सेल बसला हिरवा झेंडा दाखवला. शालेय विद्यार्थी, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत पहिल्या हायड्रोजन सेल बस ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हरदीप सिंग पुरी यांनी हायड्रोजन इंधनाची संकल्पना आणि  भविष्यातील इंधन म्हणून त्याची उपयोगिता याविषयी माहिती दिली.

हायड्रोजन बस चालवण्यासाठी फ्युएल  सेल हायड्रोजन आणि वायूचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते आणि या वाहनांमधून केवळ पाणी बाहेर पडतं. त्यामुळे, हायड्रोजन इंधनावर चालणारी  वाहनं ही  पेट्रोल आणि डिझेल वर चालणाऱ्या पारंपरिक बस गाड्यांपेक्षा पर्यावरणास सर्वात अनुकूल अशी वाहनं आहेत. तिप्पट ऊर्जा घनता आणि हानिकारक उत्सर्जन होत नसल्यामुळे, हायड्रोजन हे ऊर्जेच्या आवश्यकतेमधील हे अधिक कार्यक्षम पसंती म्हणून उदयाला येईल, असे पुरी यांनी सांगितले. याशिवाय, हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसगाड्या चार्ज करण्याकरता अवघ्या काही मिनिटांचा कालावधी लागतो, असे ते म्हणाले.

येत्या दोन दशकांमध्ये हायड्रोजन आणि जैव इंधनासारखे उदयोन्मुख इंधनाचे प्रकार जागतिक स्तरावरील इंधनाच्या वाढत्या गरजेच्या 25% वाटा पूर्ण करतील असे पुरी यांनी केंद्र सरकारच्या स्वच्छ आणि हरित ऊर्जा संबंधी महत्वाकांक्षी योजनांबद्दल माहिती देताना सांगितले. “जगातील सर्वात मोठ्या सिंक्रोनस ग्रिड्सपैकी एक असलेल्या, भारताने ‘वन नेशन-वन ग्रिड-वन फ्रिक्वेन्सी’ प्राप्त केली आहे आणि लवकरच हायड्रोजनचे उत्पादन आणि निर्यात या क्षेत्रात भारत एक जागतिक उत्पादक म्हणून आपले स्थान निर्माण करेल आणि हरित हायड्रोजनचे केंद्र म्हणून उदयाला येईल, असे त्यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »