महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याणच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागतयात्रेच्या ध्वज- लोगोचे अनावरण

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – येत्या 9 एप्रिलला गुढीपाडव्यानिमित्त निघणारी कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काहीशी विशेष असणार आहे. कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा 25 वे वर्ष असून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणकडे यजमानपद देण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर स्वागतयात्रेच्या ध्वज आणि लोगोचे आयएमए हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. जयघोष हिंदुत्वाचा, जल्लोष कल्याणकरांचा असे ब्रीदवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेमध्ये कल्याणकरांचा सहभाग वाढविण्यासाठी गेले वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सभागृहात कल्याणातील स्वागतयात्रेचे प्रणेते डॉ. सुरेश एकलहरे यांच्यासह बांधकाम व्यावसायिक पियूष बोरगावकर, स्वागतयात्रा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील, कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, सचिव विकास सुरंजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागतयात्रा लोगो आणि ध्वजाचे अनावरण करण्यात आले.

डोंबिवलीतील स्वागतयात्रेच्या सुरुवातीनंतर लगेचच दुसऱ्या वर्षीपासून म्हणजेच 2000 पासून कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या माध्यमातून हिंदू नववर्ष स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. त्यामुळे यंदा या स्वागत्यात्रेचे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष असून ही स्वागत यात्रा भव्य दिव्य अशी करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणने कंबर कसली आहे. यंदाच्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना 6 एप्रिलपासूनच सुरुवात होणार आहे. तर स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 8 एप्रिलला कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानात सांगीतिक संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती स्वागतयात्रा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. तर नविन कल्याण अशी ओळख असणाऱ्या खडकपाडा परिसरातून दोन नव्या उपयात्रा काढण्यात येणार असून त्या पारंपरिकयात्रेमध्ये जोडल्या जाणार आहेत.

या ध्वज आणि लोगो अनावरण सोहळ्याला कल्याण हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शेट्टी, कल्याण दिवाणी वकील संघटनेचे खजिनदार ॲड जयदीप हजारे, कल्याण संस्कृती मंचचे खजिनदार अतुल फडके, निखिल बुधकर यांच्यासह विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, जायंटस् ग्रुप, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बाइकर्स ग्रुप, भजनी मंडळे, ढोलताशा पथके, गणेशोत्सव मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »