महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कला/साहित्य चर्चेची बातमी

आंतरराष्ट्रीय शिल्पकार भाऊ साठेंना स्मरण शिल्प महर्षी’च्या माध्यमातून अनोखी श्रद्धांजली

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलातपस्वी शिल्पकार सदाशिव तथा भाऊ साठे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. अशा या जागतिक किर्तीप्राप्त कलाकाराला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी कल्याणात संस्कार भारती कल्याण या संस्थेतर्फे ‘स्मरण शिल्प महर्षीचे’ ह्या श्रद्धांजलीपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणात अभिनव विद्या मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक दिग्गज लोकांनी उपस्थिती लावत भाऊंच्या आठवणी जाग्या केल्या. या कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून विख्यात चित्रकार सुहास बहुळकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, कलाकार आणि कल्याण गायन समाजाचे अध्यक्ष डॉ. संदीप जाधव होते.

सुरवातीला भाऊंच्या शिल्पाला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केल्यावर कै. भाऊ साठेंसह नुकतेच निधन झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे ख्यातनाम चित्रकार सुहास बहुळकर यांनी दृकश्राव्य पद्धतीने भाऊंचा जीवनपट सर्वांपुढे उलगडून दाखविला.
संस्कार भारतीचे कोषाध्यक्ष सुधीर जोशी यांच्या प्रास्ताविकानंतर, आयबीएन लोकमतवर ‘ग्रेट भेट’ या कार्यक्रमात प्रसारित झालेली भाऊ साठेंची मुलाखत यावेळी दाखविण्यात आली. त्यानंतर भाऊंचा पुतण्या शिल्पकार सिद्धार्थ साठे यांनी भाऊंचे सुंदर असे शिल्प सर्वांसमोर उभे केले. तर कल्याण जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक, संस्कार भारतीचे संघटक राजन जोशी यांच्यासह भाऊंचे चिरंजीव श्रीरंग साठे यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. संदीप जाधव यांनी चित्रकार असलेले त्यांचे वडील आणि भाऊ साठे यांच्या आठवणी सांगितल्या. तर भाऊंची शिल्पे जतन करून ठेवलेल्या डोंबिवलीतील ‘शिल्पालयाचा’ परिचय करुन देणारी चित्रफित दाखवून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाला अनेक चित्रकार, कलाकार, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य अशोक प्रधान, डॉ. सुरेश फडके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »