महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

 नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी - देशातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आज सुरुवात झाली आहे.सकाळपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणार आहे.निवडणुकीच्या या रणधूमाळीत स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती करणारे विविध उपक्रम सर्व स्तरांवर राबविण्यात येत असून देशाचे उद्याचे नागरिक असणा-या विद्यार्थ्यामार्फत त्यांच्या पालक व नातेवाईकांपर्यंत मतदान करुन लोकशाहीतील हक्क बजावण्याचा संदेश प्रसारित केला जात आहे.याकरिता शाळा व महाविद्यालयांमध्ये नानाविध उपक्रम नाविन्यपूर्ण रितीने राबविण्यात येत आहेत

“चला,मतदान करण्यास पुढे येऊया-आपल्या देशाचा विकास करुया” अशी मतदान विषयक जनजागृती करणारी घोषवाक्ये लिहून त्याला अनुरुप चित्रे व रांगोळी रेखाटत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपापल्या संकल्पना वापरत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले.20 मे रोजी 25 ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान होणार असून त्या अनुषंगाने 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीचा स्वीप कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत शालेय पातळीवर मतदान जनजागृतीविषयक चित्रे व रांगोळी काढण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक व 23 माध्यमिक अशा एकूण 80 शाळांसह 200 हून अधिक खाजगी शाळांमध्येही चित्रे व रांगोळीच्या माध्यमातून मतदान विषयक जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला.यामध्ये विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करावे असे आवाहन करणा-या संकल्पना चित्र व रांगोळीच्या माध्यमातून रेखाटल्या. अनेक शाळांमध्ये पालकांनीही भेटी देऊन या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहीत केले.तसेच शिक्षकांमार्फत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा करण्यात आली.
Related Posts
Translate »