महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी शिक्षण

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवारांनी मारली बाजी

DESK MARATHI NEWS.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून  देशभरातून एकूण 1009 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून 90 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून  प्रथम आले असून देशात 3 रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना 26वा ऑल इंडिया रँक मिळाला  आहे. पहिल्या 100 मध्ये राज्यातील 7 उमेदवार आहेत.

 राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार

अर्च‍ित पराग डोंगरे (03) शिवांश सुभाष जगदाळे (26) शिवानी पांचाळ (53) अदिती संजय चौघुले  (63) साई चैतन्य जाधव (68) विवेक शिंदे   (93) तेजस्वी प्रसाद देशपांडे (99)  दिपाली मेहतो (105) ऐश्वर्या मिलिंद जाधव (161) शिल्पा चौहान (188) कृष्णा बब्रुवान पाटील (197) गौरव गंगाधर कायंदे पाटील (250) मोक्ष दिलीप राणावत (251)प्रणव कुलकर्णी (256)  अंकित केशवराव जाधव (280) आकांश धुळ (295) जयकुमार शंकर आडे (300) अंकिता अनिल पाटील (303) पुष्पराज नानासाहेब खोत (304) राजत श्रीराम पात्रे (305) पंकज पाटले (329) स्वामी सुनील रामलिंग (336)अजय काशीराम डोके (364) श्रीरंग दीपक कावोरे (396) वद्यवत यशवंत नाईक (432) मानसी नानाभाऊ साकोरे (454) केतन अशोक इंगोले (458) बच्छाव कार्तिक रवींद्र (469) अमन पटेल (470) संकेत अरविंद शिंगाटे (479) राहुल रमेश आत्राम (481) चौधर अभिजीत रामदास (487) बावणे सर्वेश अनिल (503) आयुष राहुल कोकाटे (513) बुलकुंडे सावी श्रीकांत (517)  पांडुरंग एस कांबळी (529) ऋषिकेश नागनाथ वीर (556)  श्रुती संतोष चव्हाण (573) रोहन राजेंद्र पिंगळे (581) अश्विनी संजय धामणकर (582) अबुसलीया खान कुलकर्णी (588) सय्यद मोहम्मद आरिफ मोईन (594)वेदांत माधवराव पाटील (601) अक्षय विलास पवार (604) दिलीपकुमार कृष्ण देसाई (605) गायकवाड ऋषिकेश राजेंद्र (610) स्वप्नील बागल (620) सुशील गिट्टे (623)  सौरव राजेंद्र ढाकणे (628) अपूर्व अमृत बलपांडे (649) कपिल लक्ष्मण नलावडे (662) सौरभ येवले (669) नम्रता अनिल ठाकरे (671) ओंकार राजेंद्र खुंताळे (673) यश कनवत (676) बोधे नितीन अंबादास (677) ओमप्रसाद अजय कंधारे (679) प्रांजली खांडेकर (683) सचिन गुणवंतराव बिसेन (688)  प्रियंका राठोड (696) अक्षय संभाजी मुंडे (699)अभय देशमुख (704) ज्ञानेश्वर बबनराव मुखेरकर (707) विशाल महार (714) अतुल अनिल राजुरकर (727) अभिजित सहादेव आहेर (734) भाग्यश्री राजेश नायकेले (737) श्रीतेश भूपेंद्र पटेल (746) शिवांग अनिल तिवारी (752) पुष्कर लक्ष्मण घोळावे (792) योगेश ललित पाटील (811) श्रुष्टी सुरेश कुल्ये (831) संपदा धर्मराज वांगे (839) मोहिनी प्रल्हाद खंदारे (844) सोनिया जागरवार (849) अजय नामदेव सरवदे (858) राजू नामदेव वाघ (871) अभिजय पगारे (886) हेमराज हिंदुराव पनोरेकर (922) प्रथमेश सुंदर बोर्डे (926)गार्गी लोंढे (939) सुमेध मिलिंद जाधव (942) आनंद राजेश सदावर्ती (945) जगदीश प्रसाद खोकर (958) विशाखा कदम (962) सचिन देवराम लांडे (964) आदित्य अनिल बामणे (1004)

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी परीक्षा 2024

 केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी – एप्रिल 2025 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1009 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून 335, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 109, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 318, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 160, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 87  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 725 पुरूष तर 284 महिला उमेदवार आहेत.

एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 50  दिव्यांग आहेत. लोकसेवा आयोगाने 230 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट 115, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 35,  इतर मागास वर्ग 59, अनुसूचित जाती 14, अनुसूचित जमाती  06, दिव्यांग 01  उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण 180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण  73, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओबीसी) 52, अनुसूचित जाती (एससी)  24, अनुसूचित जमाती (एसटी) 13  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण  55 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन)  23, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 05,  इतर मागास वर्ग (ओबीसी)  13, अनुसूचित जाती (एससी)  09, अनुसूचित जमाती (एस.टी.)  05 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण  147 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन)  60,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 14,  इतर मागास प्रवर्गातून 41, अनुसूचित जाती प्रवर्गातून  22, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून  10  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण  605 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 244, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 57 , इतर मागास प्रवर्गातून – 168, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 90 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –46  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 142   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 55, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  15 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 44, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 241 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  आहे. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

यावर्षी च्या उत्तीर्ण उमेदवारामध्ये महाराष्ट्राचा श्री. डोंगरे अर्चित पराग (रोल क्र. ०८६७२८२)  यांनी वेल्लोर येथील व्हीआयटी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवीधर (बी.टेक.) केलेले असून युपीएससी परीक्षेत तत्वज्ञान हा पर्यायी विषय घेऊन देशभरात  तिसरा क्रमांक पटकावला आहे.

पहिल्या २५ उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुष आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता आयआयटी, एनआयटी, व्हीआयटी, जेएनयू, दिल्ली विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठ यासारख्या देशातील प्रमुख संस्थांमधून अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय विज्ञान आणि वास्तुकला या विषयातील पदवीपर्यंत आहे.

पहिल्या २५ यशस्वी उमेदवारांनी लेखी (मुख्य) परीक्षेत मानववंशशास्त्र, वाणिज्य आणि लेखाशास्त्र, भूगोल, गणित, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक प्रशासन, समाजशास्त्र आणि तमिळ भाषेचे साहित्य यासह विविध पर्यायी विषयांची निवड केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »