महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
अर्थसत्ता चर्चेची बातमी

५५ कोटीच्या बोगस पावत्या प्रकरणी दोन जणांना अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

भिवंडी – केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आयुक्तालयाच्या मुंबई विभागातील भिवंडी शाखेने, बोगस जीएसटी पावत्यांची दोन प्रकरणे उघडकीला आणली आहेत. यामध्ये 55 कोटी रुपये किमतीच्या बोगस पावत्यांच्या मदतीने अंदाजे 23 कोटी रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC), दावा केल्याचे उघडकीला आले आहे. या प्रकरणी सीजीएसटी कायद्या अंतर्गत, मेसर्स एम. एम. बिल्डकॉन/लंबोदर बिल्डकॉनचे मालक आणि मेसर्स विश्वकर्मा एंटरप्रायझेसचे मालक या दोन व्यक्तींना 18.08.22 रोजी अटक करण्यात आली आहे. 

विशिष्ट माहितीच्या आधारे सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाच्या कर-चुकवेगिरी विरोधी शाखेने या दोन कंपन्यां विरोधात तपास सुरु केला. या तपासामध्ये दोन्ही कंपन्या अस्तित्वात नसल्याचे/बोगस असल्याचे आढळून आले. अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांनी आपल्या जबाबामध्ये फसवणूक आणि कर-चुकवेगिरी केल्याचे कबूल केले. त्यांनी 23 कोटी रुपये इनपुट टॅक्स  क्रेडीटचा दावा करत या अस्तित्वात नसलेल्या/बोगस/अवैध कंपन्या/बनावट कंपन्यांच्या  बोगस पावत्यांद्वारे तो वळवला.

तपासा दरम्यान गोळा करण्यात आलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे दोन्ही कंपन्यांच्या मालकांना सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत 18.08.2022 रोजी अटक करण्यात आली.         

हे प्रकरण सीजीएसटी मुंबई विभागाने कर-चुकवेगिरी करणारे आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) यंत्रणे विरोधात उघडलेल्या विशेष मोहिमेचा भाग आहे. सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने गेल्या एका वर्षात केलेली ही 15 वी आणि 16 वी अटक आहे.

संभाव्य कर-चुकवेगिरी करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी सीजीएसटी अधिकारी डेटा (विदा) विश्लेषण आणि यंत्रणा विश्लेषण साधनांचा वापर करत आहेत. कर-चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील ही मोहीम येत्या काही दिवसांत सीजीएसटी अधिकारी आणखी तीव्र करणार आहेत. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »